शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

513 ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 12:58 IST

‘महावितरण’ची कारवाई : भर पावसाळ्यात नागरिकांचे हाल

ठळक मुद्देभर पावसाळ्यात नागरिकांना  पाण्यासाठी वणवण भटकंतीवरणगाव नगर परिषदेकडे 1 कोटी 69 लाख रुपयांची महावितरणची थकबाकी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 - जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची 142 कोटींची थकबाकी आह़े अनेकदा नोटीस, सूचना देवूनही थकबाकी भरली जात नसल्याने महावितरण कंपनीने 15 तालुक्यांमधील 513  ग्रामपंचायतींचा सार्वजनिक पाणीपुरवठय़ाचा वीजपुरवठा खंडित केला आह़े त्यामुळे भर पावसाळ्यात नागरिकांना  पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आह़ेमहावितरण कंपनीचे औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मोठय़ा प्रमाणावर थकबाकीमुळे वीजबिल थकीत असलेल्या सर्व सार्वजनिक पाणीपुरवठा तसेच नगरपालिका पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जळगाव परिमंडळाला दिले आहेत़ या आदेशाच्या पाश्र्वभूमिवर महावितरण कंपनीतर्फे ठिकठिकाणी कारवाईची मोहिम राबविण्यात येत आह़ेजिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची 142 कोटींची थकबाकी आह़े या थकबाकीमुळे 513 ग्रामंपचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर त्या-त्या ग्रा़पं़तील पदाधिकारी लोकप्रतिनिधींची भेट घेतात़ त्यानुसार लोकप्रतिनिधींकडून महावितरणवर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़ेमहावितरणच्या कारवाईमुळे नाहक ग्रामस्थांना वणवण भटकण्याची वेळ आली आह़े याबाबत जिल्हा परिषदेतील ग्रा़पं़प्रशासन विभागाचे अधिकारी बोटे यांना विचारले असता, महावितरणची थकबाकी भरण्याची जबाबदारी त्या ग्रा़पं़ची आह़े त्यांना यासाठी थेट शासनाकडून निधी मिळतो़ अशी माहिती त्यांनी दिली़वरणगाव नगर परिषदेकडे 1 कोटी 69 लाख रुपयांची महावितरणची थकबाकी आह़े वारंवार लेखी व तोंडी सूचना देवूनही थकबाकी भरली जात नसल्याने महावितरण कंपनीने मुख्याधिकारी यांना नोटीस दिली असून पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आह़े