शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात संतप्त नागरिकांनीच काढले वीज चोरीचे आकोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 14:21 IST

आकोड्यांच्या विद्युत भारामुळे रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्यामुळे रोहित्रावरील आकोडे काढल्यावरच दुरूस्तीची कामे होतील असा पवित्रा महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतल्याने संतप्त रहिवाशांनी रविवारी दुपारी ४ वाजता रस्त्यावर उतरून रोहित्रावरील आकोडे काढले़

ठळक मुद्देतानाजी मालुसरे नगरात ३ दिवसांपासून वीज खंडितसंतप्त नागरिक उतरले रस्त्यावरआकोड्यांमुळे जळाले रोहित्र

जळगाव : आकोड्यांच्या विद्युत भारामुळे रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्यामुळे रोहित्रावरील आकोडे काढल्यावरच दुरूस्तीची कामे होतील असा पवित्रा महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतल्याने संतप्त रहिवाशांनी रविवारी दुपारी ४ वाजता रस्त्यावर उतरून रोहित्रावरील आकोडे काढले़ दीड तास हा गोंधळ सुरू होता़ त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता़आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे नगरातील रोहित्रावर दोन फिडरचे फेज एकत्र आहेत़ त्यामुळे एकाच भागातील शेकडो नागरिकांनी या रोहित्रावर आकोडे टाकून वीजपुरवठा घेतला आहे़ ज्यांच्याकडे वीजमीटर आहेत त्यांनी सुध्दा या रोहित्रावर आकोडे टाकले होते़ यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वीजभार रोहित्रावर पडला आहे. परिणामी शुक्रवारी संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला़ तर काही भागात कमी दाबाचा वीजपुरवठा सुरू होता़ एक दिवस उलटून सुध्दा वीज सुरळीत न झाल्यामुळे तानाजी मालुसरे नगरातील अधिकृत वीजमीटर असलेल्या काही महिलांनी शनिवारी दुपारी ४ वाजता दीक्षितवाडीतील महावितरणाच्या कार्यालयात धाव घेत तक्रार दाखल केली़ त्यानंतर रविवारी देखील वीज सुरळीत न झाल्यामुळे पुन्हा दुपारी मंगला सोनवणे, सरला सोनवणे, मयुर ठाकरे, शाम मराठे यांच्यासह रहिवाश्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली़ मात्र, जो पर्यंत रोहित्रावरील आकोडे काढल्याशिवाय दुरुस्ती शक्य नसल्याचा पवित्रा महावितरणने घेतला. महावितरणच्या कर्मचाºयांनी देखील विद्युत खांबावर चढून आकोड्यांच्या तसेच रोहित्रावर असलेल्या वायर्स कापल्या.काही महिलांनीच रोहित्राजवळ येऊन आकोडे काढण्यास सुरुवात केली. बघता-बघता शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले़ त्यानंतर आकोडे टाकलेल्यांनीच पुढे येत आपले आकोडे काढण्यास सुरुवात केली. यामुळे रस्त्यावर रहिवाश्यांची प्रचंड गर्दी झाली होती़ याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते़

टॅग्स :Jalgaonजळगावmahavitaranमहावितरण