शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नगरदेवळ्यात विजेच्या धक्क््याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:58 IST

नगरदेवळा ता. पाचोरा येथील चुंचाळे शिवारातील वीज सयंत्रावर काम करीत असतांना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देतात्पुरत्या स्वरुपातील कार्यरत होता वायरमनवीज पुरवठा सुरू झालाच कसा- जाणकारांचा सवाल

नगरदेवळा ता.पाचोरा : येथील चुंचाळे शिवारातील वीज सयंत्रावर वायर जोडणीचे काम करीत असताना वीज कर्मचाºयास विजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.पोलीस सूत्रानुसार, रूपेश सुकदेव पाटील (वय २४ रा.तारखेडा ता. पाचोरा) असे या मयत कर्मचाºयाचे नाव असून तो नगरदेवळा वीज मंडळात तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी म्हणून कार्यरत होता.या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रूपेश पाटील हा शुक्रवारी सायंकाळी त्याचा सहकारी वायरमन राठोड याच्यासह चुंचाळे शिवारातील शेतकरी ईश्वर संतोष पाटील यांच्या शेतातील विजसंयंत्रावर (डिपी) वायर जोडणीचे काम करीत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने रूपेश यास जोरदार धक्का लागून तो खाली कोसळला. त्यास शेतकरी बांधव व सहकारी वायरमन यांनी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले, परंतु वैद्यकिय अधिकाºयांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या प्रकरणी नगरदेवळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रूपेश याच्या पश्चात विधवा आई ,एक भाऊ असा परीवार आहे.दरम्यान, विज जोडणीसारखे महत्वाचे काम कर्मचारी जिवावर खेळून करीत असतात. ज्या संयंत्रावर काम सुरू असते त्यावेळी त्या संयंत्रासोबतच संपूर्ण परिसराचा वीज संपर्क बंद ठेवण्याचा मेमो असतो. काम पुर्ण झाल्यावर त्यावर काम करणारा कर्मचारी काम संपल्याची सूचना करून मेमो रद्द केल्यावरच वीज संपर्क पुर्ववत करण्यात येतो.या ठिकाणीही संबंधीत कर्मचाºयांनी मेमो घेतल्याची माहीती मिळाली आहे. तथापि विजपुरवठा सुरू कसा झाला आणि दुर्घटना कशी घडली, याबाबत चर्चा सुरू असून वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे तरुणाला आपला जीव तर गमवावा लागला नाही ना ? अशी शंका व्यक्त होत आहे. 

टॅग्स :electricityवीज