शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील प्रभाग ५ मधील मतदार यादीतील घोळाबाबत चौकशी पथक नेमण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:04 IST

२ हजार २३९ मतदारांचा घोळ

ठळक मुद्देहरकतींवर पडताळणीचे काम सुुरुप्रभाग ५ हा मतदारांच्या संख्येनुसार सर्वात मोठा प्रभाग आहे

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांमधील प्रभाग ५ मध्ये २ हजार २३९ नावांची पडताळणी करून, चौकशी पथक नेमण्याचा सूचना राज्य निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांना हे पत्र प्राप्त झाले.मनपा प्रशासनाकडून ५ जून रोजी जाहीर झालेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे १५ जूनपर्यंत सुमारे २ हजारहून अधिक हरकती मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. दरम्यान, प्रारुप मतदार याद्यातील घोळ व प्रभाग पाच मधे दोन हजाराच्यावर नावांचा घोळ झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे अ‍ॅड. विश्वजीत देशमुख यांनी केली होता. यावर निवडणूक आयोगाने मनपास पत्र दिले असून या प्रकरणी चौकशी पथक नेमून प्रभाग ५ मधील २ हजार २३९ नावांची पडताळणी बीएलओलोच्या माध्यमातून करण्याचे सुचना दिल्या आहे. त्यानुसार बुधवारी या प्रभागात नावांची पडताळणी व तपासणी केल्यानंतर तीन दिवसात हा अहवाल निवडणूक आयोगाला देण्याचे सुचना देखील या पत्रकाव्दारे करण्यात आल्या आहेत.हरकतींवर पडताळणीचे काम सुुरुप्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांबाबत आलेल्या हरकतींची प्रभागनिहाय विभागणी केल्यानंतर मनपाकडून हरकतींच्या पडताळणीचे काम सुरु झाले आहे. मनपाचे अभियंते प्रत्यक्ष घरी जावून पडताळणी करून घेत आहेत.२७ जून रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार होती. मात्र, यामध्ये २ दिवसांची मुदत वाढवून आता २९ जून रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.काय आहे प्रकरणशहरातील १९ प्रभागांपैकी प्रभाग ५ हा मतदारांच्या संख्येनुसार सर्वात मोठा प्रभाग आहे. या प्रभागात २७ हजार १६५ इतकी मतदार संख्या आहे. मात्र, या प्रभागातील लोकसंख्या मतदार संख्येपेक्षा कमी असून या प्रभागात २४ हजार ९६२ इतकी लोकसंख्या आहे. लोकसंख्येपेक्षा तब्बल २ हजार मते जास्त असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव