वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : येथील नवोदय विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केलेली साकरी फाटा येथील ६५ वर्षीय महिला मंगळवारी सकाळी अकराला बेपत्ता झालीे. या घटनेमुळे खळबळ उडाली.या वृद्ध महिलेचा स्वॅब घेतला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकारामुळे जळगाव येथील बेपत्ता महिलेच्या प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे.या महिलेचे काही प्रमाणात मानसिक संतुलन बिघडले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या महिलेचा होमगार्ड असलेला मुलगा तेथे त्यांच्याच परिवारातील क्वॉरंटाईन असलेल्या मुलांना दूध देण्यासाठी आला, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.दरम्यान, याआधी शहरातीलच सुकदेव पाटील नगरातील एक वृध्द महिलादेखील जळगाव येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधून बेपत्ता झाली होती. या महिलेचा मृतदेहच रुग्णालयातील शौचालयात आढळला होता. आता यानंतर भुसावळातील नवोदय विद्यालय कोविड सेंटरमधूनही वृद्ध महिला बेपत्ता झाल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली आहे.दरम्यान, या महिलेस तिच्या मुलाने नशिराबाद, भुसावळ बस व रेल्वे स्टेशन परिसर, साकरी फाटा भाग यासह नातेवाईकांकडे शोधले, मात्र ती आढळली नाही. याप्रकरणी बुधवारी रात्री शहर पोलिसात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळच्या कोविड सेंटरमधून वृद्ध महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:12 IST
नवोदय विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केलेली साकरी फाटा येथील ६५ वर्षीय महिला मंगळवारी सकाळी अकराला बेपत्ता झालीे.
भुसावळच्या कोविड सेंटरमधून वृद्ध महिला बेपत्ता
ठळक मुद्देवृद्धेचा मुलगा सकाळी दूध देण्यासाठी आला तेव्हा उघडकीस आला प्रकारवृद्धेचे काही प्रमाणात मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगण्यात येते