शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

लसीकरणात तरुणांपेक्षाही ज्येष्ठांचा उत्साह अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या चौथ्या टप्प्याला आठवडा उलटला आहे. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या चौथ्या टप्प्याला आठवडा उलटला आहे. त्यात गेल्या आठ दिवसांत ४० हजारांपेक्षा अधिक लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यात २५ हजारांपेक्षा अधिक ४५ वर्षांवरील नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरीकडे आरोग्य, फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण बंद झाले असून आता केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात आहे. दरम्यान, एकत्रित आकडेवारी बघता तरुणांपेक्षा ज्येष्ठांचा या लसीकरणात अधिक उत्साह दिसून येत आहे.

लसीकरणासाठी जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोनही लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे. पहिला टप्पा संथगतीने झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात लसीकरणात गती आली आहे. एका दिवसाला सरासरी आता ७ हजारांवर लसीकरण होत आहे. दरम्यान, सर्वच केंद्रांवर अन्य कोणापेक्षही ज्येष्ठांची संख्या अधिक दिसत असून १०२ वर्षांच्या वृद्ध महिलेनेही लस घेतली आहे.

असे झाले आहे लसीकरण

४५ - ६० वर्ष : पहिला डोस - २४९३३, दुसरा डोस - १५७

६० वर्षावरील : पहिला डोस ७४४३९, दुसरा डोस- ३७२

आरोग्य कर्मचारी : पहिला डोस - २४२९१, दुसरा डोस - १००९१

फ्रंट लाईन वर्कर : पहिला डोस - २२३२२, दुसरा डोस - ६०४७

एकूण लसीकरण पहिला डोस १६१२०१, दुसरा डोस १८२७२

खासगी रुग्णालये पहिला डोस २६९३२, दुसरा डोस ७७१

ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद

शहरांपेक्षा ग्रामीण भागात लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मंगळवार ६ एप्रिलपर्यंत ५२१५४ इतक्या नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर शहरी भागात हेच प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. जळगाव शहरातील रेडक्रॉस रक्तपेढीचे केंद्र : ८०७४ एवढे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात लसीकरणाचा चौथा टप्पा गतीने सुरू आहे. केंद्र वाढविण्यात आले आहेत. कोव्हॅक्सिन लसीचे नुकतेच काही डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त होणार आहे. महिनाभरात चौथा टप्पा पूर्ण करायचे उद्दिष्ट आहे. सर्वच केंद्रांवर आता प्रतिसाद चांगला मिळत आहे.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकीत्सक