शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात ग्रामसेवकांचा गटविकास अधिकाºयांविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:59 IST

असंवैधानिक भाषा वापरल्याचा आरोप

ठळक मुद्देसोशल मीडियावर असंवैधानिक भाषा वापरत असल्याचा ग्रामसेवकांचा आरोपकारवाई केल्याचा राग आल्याने संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गटविकास अधिकाºयांची भूमिका

अमळनेर, जि.जळगाव : ग्रामसेवकांना सोशल मीडियावर असंवैधानिक व अशासकीय भाषा वापरणाऱ्या गटविकास अधिकाºयाविरुद्ध ग्रामसेवक युनियनने एल्गार पुकारला असून, निवेदनाद्वारे बहिष्काराचा इशारा देण्यात आला आहे.१३ व १६ रोजी प्रभारी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सोशल मिडियावर व वैयक्तिक व्हॉट्सएप ग्रुपवर निलंबन, चौकशी प्रस्तावित करण्याबाबत धमक्या दिल्या. प्रभारी गटविकास अधिकाºयांनी अतिरिक्त पदाचा उच्छाद मांडला असल्याचा आरोपही संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे. तसेच आचारसंहिता संपल्यानंतर वेळोवेळी मागणी केल्यावरदेखील प्रशासकीय विनंती बदल्या शासन आदेश असतानाही ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी संवर्गाच्या बदल्या आपण केलेल्या नाहीत, ‘ड’ याद्या सर्वेक्षणाचे कामात कुठलाही आदेश नसताना कामकाज सुरू आहे, परंतु तांत्रिक अडचणींमुळे सदर काम धीम्या गतीने सुरू आहे. तरी सोशल मीडियावर ग्रामसेवकांबाबत असंविधानिक व अशासकीय भाषेचा वापर केला जात आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.या मानहानीमुळे ग्रामसेवकांचे मनोधैर्य खचले आहे, त्यामुळे हे प्रकार बंद करावेत अन्यथा बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष संजय पाटील, सचिव संजय सैंदाणे, मानद अध्यक्ष जी.एम.पवार, एन.एस.पाटील, एम.एन.ठाकूर, माजी अध्यक्ष दिनेश साळुंखे, डी.के.मोरे यांच्यासह ६४ ग्रामसेवकांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, सभापती वजाबाई भिल व संघटनेच्या राज्याध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.कामाच्या बाबतीत अमळनेर तालुका मागे असल्यामुळे कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करणे सुरू केल्याचा राग आल्याने संघटनेतर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र माझी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यात माघार घेणार नाही-संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर 

टॅग्स :agitationआंदोलनAmalnerअमळनेर