वाघडू, ता.चाळीसगाव : वाघडू येथे भाऊजई व जेठाचे एकाच दिवशी निधन झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाघडू येथील लताबाई अजबराव पाटील (५०) यांचे गुरुवार रोजी दुपारी १२ वाजता स्वयंपाक करता करता हृदयविकाराने निधन झाले. घरातील सर्वांसाठी हा धक्काच होता. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून जेठ आबासाहेब गणपत पाटील (५५) यांनाही छातीत दुखू लागल्याने त्यांनाही वसई येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु रात्री ११ वाजता भाऊजईपाठोपाठ काही तासांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचेही निधन झाले. भाऊजई जेठाचे एकाच दिवशी काही तासाच्या अंतराने निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांवर वाघडू येथे शुक्रवारी (दि. २५) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे भाऊ पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब पाटील, मुलगा, दोन मुली, तर लताबाई पाटील यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
---
फोटो ७/७