शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंनी पवारांना केला वाकून नमस्कार, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:34 IST

शरद पवार यांचे भाषण सुरू असताना खडसे कार्यक्रमस्थळी पोहोचले.

जळगाव: भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी जळगावात झालेल्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना व्यासपीठावरच वाकून नमस्कार केला. खडसेंच्या या कृतीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जळगावात शुक्रवारी अनेक विकासकामांची उद्घाटने होणार होती. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत या कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळले. मात्र, एकनाथ खडसे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहायचे टाळण्यासाठीच त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे केल्याची चर्चा काल रंगली होती. यानंतर एकनाथ खडसे यांनी नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. यापैकी जैन हिल्सवर आयोजित पद्मश्री अप्पासाहेब पवार उच्च कृषितंत्र पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात शरद पवार हेदेखील उपस्थित होते. शरद पवार यांचे भाषण सुरू असताना खडसे यांचे आगमन झाले होते. त्यानंतर शरद पवार भाषण करून परत येत असताना खडसे उठून उभे राहिले आणि पवार जवळ येताच खडसेंनी त्यांना वाकून नमस्कारही केला. याच कार्यक्रमानंतर शरद पवार आणि  खडसे यांच्यात एकातांत 10 मिनिटे चर्चाही झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवार