शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी, गिरीश महाजन यांच्याबद्दल अपशब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:05 IST

भाजपात अन्य नेत्यांवरही आरोप झाले मात्र त्यांना वेगळा अन् खडसेंना वेगळा न्याय का? खडसेंचे पुनर्वसन का केले जात नाही, यावरून शनिवारी भाजपाच्या जिल्हा बैठकीत खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जळगाव : भाजपात अन्य नेत्यांवरही आरोप झाले मात्र त्यांना वेगळा अन् खडसेंना वेगळा न्याय का? खडसेंचे पुनर्वसन का केले जात नाही, यावरून शनिवारी भाजपाच्या जिल्हा बैठकीत खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दलही अपशब्द काढले. या गोंधळातच माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी खडसेंच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्याने पाठपुरावा करण्याचा ठराव मांडला.एमआयडीसीतील खाजगी हॉटेलच्या प्रांगणात दुपारी ही बैठक झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जैन मुनींबद्दल अपशब्द काढल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव यावेळी झाला. या दरम्यान खडसे समर्थकांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधाचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पुढे येत खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवण्यात येत आहे. काही नेत्यांवर आरोप होऊन वेगळा न्याय दिला जातो, मग खडसेंबद्दलच अशी भूमिका का? त्यांच्या पुनर्वसनाचा ठराव मांडा, असे सांगत प्रचंड आरडाओरड व गोंधळ सुरू झाला.बैठकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण आता त्यासाठी भिक नको...तसे वाटता कामा नये. जे केले ते पक्षवाढीसाठी केले. ज्येष्ठ नेते अडवाणींचे काय झाले..असा चिमटा घेऊन नव्यांना संधी दिली पाहिजे, आम्ही मार्गदर्शन करू असा चिमटाही त्यांनी घेतला.बांडगुळाचे काय?खडसेंचे भाषण सुरू असताना एक कार्यकर्ता गिरीश महाजन यांचे नाव न घेता म्हणाला.. बांडगुळाचे काय? यावर खडसे उत्तरले.. त्यांच्याही कर्तृत्वाला वाव दिला जावा. तुम्ही सयंम ठेवा. पक्ष शिस्तीचे पालन करा. याचा महाजन यांनी भाषणात चांगला समाचार घेतला. ते म्हणाले की, पक्षासाठी आम्हीही जिवाचे रान केले. कुण्या एकट्याच्या जिवावर हा पक्ष वाढलेला नाही. माझ्याबद्दल अपशब्द वापरले गेले. मी उत्तर देऊ शकतो पण बोलणार नाही. बोलणा-यांचे डोके ठिकाणावर आहे काय?महाजन इन खडसे आउट...दुपारी १.३० वाजता ही बैठक होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे दुपारी ४.३० वाजता बैठक स्थळी पोहचले. यावेळी खडसे यांनी भाषण आटोपले. महाजन यांच्याशी बोलून ते बाहेर पडले. खडसे बाहेर पडताच त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्तेही सभागृहाबाहेर पडले.

टॅग्स :BJPभाजपा