बोदवड, जि. जळगाव : प्रेमाला घरच्यांच्या विरोध असल्याने बोदवड येथे तरुण-तरुणीने सोबतच विषप्राशन केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. दोघांनाही जळगाव येथे हलविले आहे.तालुक्यातीलच रहिवासी असलेल्या या तरुण-तरुणीने बोदवड येथे येऊन सकाळी विष घेतले. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच त्यांना जळगाव येथे रुग्णालयात हलविण्यात आले.
‘एक दुजे के लिए.....’ बोदवड येथे प्रेमी युगुलाने केले सोबतच घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:44 IST