शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोघांना आठ वर्ष सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 16:39 IST

उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणात रशीद कबीर शेख व रफिक उर्फ इकबाल रशीद शेख या दोघांना न्यायालयाने सोमवारी आठ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

जळगाव : कपडे धुण्याच्या कारणावरून अनिल सखाराम मोरे (रा.नागदुली, ता.एरंडोल) यांना झालेली मारहाण व त्यानंतर उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणात रशीद कबीर शेख व रफिक उर्फ इकबाल रशीद शेख या दोघांना न्यायालयाने सोमवारी आठ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.याबाबत अधिक माहिती अशी की, नागदुली येथे १९ ऑगस्ट २०१७ रोजी अनिल मोरे यांची मुलगी मुतारीजवळ धुणे धुत असताना रशीद व रफिक या दोघांनी मोरे यांच्या मुलीस धुणं धुण्यास मनाई केली. त्यावर मोरे यांनी गावातील सर्व महिला येथे धुणे धुतात मग, माझ्याच मुलीला विरोध का असे म्हटले असता दोघांनी अनिल मोरे यांना लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी डोक्याला, पोटावर व पायावर जबर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघं आरोपींविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला खून व ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता.प्रत्यक्षदर्शीची साक्ष व मृत्यूपूर्व जबाब ठरला महत्वपूर्णतपासाधिका-यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मोरे यांची मुलगी व तपासाधिका-यांनी घेतलेला मृत्यूपूर्व जबाब महत्वपूर्ण ठरला. यात १५ जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. पुरावा, सरकारी वकील चारुलता राजेंद्र बोरसे यांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांना कलम ३०४ भाग २ व ३२३ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून ८ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.चारुलता बोरे यांनी कामकाज पाहिले. केसवॉज बैसाने व पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार शालीग्राम पाटील यांनी मोलाची मदत केली.