शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहनातून आले आठ चोरटे, इलेक्ट्रिक साहित्य घेऊन झाले पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST

जळगाव : मालवाहतूक वाहनातून आलेल्या आठ चोरट्यांनी कानळदा रस्त्यावरील श्रीनाथजी सॉ मिल फोडून सुमारे लाख रुपयांची वायर बंडल, अ‍ॅम्प्लिफायर, ...

जळगाव : मालवाहतूक वाहनातून आलेल्या आठ चोरट्यांनी कानळदा रस्त्यावरील श्रीनाथजी सॉ मिल फोडून सुमारे लाख रुपयांची वायर बंडल, अ‍ॅम्प्लिफायर, मिक्सर तसेच स्पीकर चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश्वर कॉलनी येथील रहिवासी समीर नटवरलाल शाह यांची कानळदा रस्त्यावर श्रीनाथजी सॉ मिल आहे़ त्याच ठिकाणी त्यांचे ऑफिस व साऊंड सिस्टीमचे दुकानही आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शाह हे सॉ मिल बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सॉ मिलचे कुलूप तोडून इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले़ शनिवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास समीर शाह यांचे बंधू सुधीर हे सॉ मिल उघडण्यासाठी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. हा प्रकार त्यांनी लागलीच भाऊ समीर यांना सांगितले. सॉ मिलमध्ये पाहणी केली असता, सुमारे लाख रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.

मूर्तिकारांना दिसले चोरटे

सॉ मिलच्या शेजारी काही मूर्तिकार वास्तव्यास आहेत़ मध्यरात्री १.३० ते २.३० वाजेच्या सुमारास मालवाहतूक वाहनातून आठ व्यक्ती उतरले़ त्यांनी काही वेळ सॉ मिलच्या बाहेर गोंधळ घातला. नंतर चोरी करून वाहनातून पसार झाले. त्यांच्या हातात शस्त्र असल्यामुळे भीतीपोटी घराबाहेर न निघाल्याचे मूर्तिकार यांनी समीर शाह यांना सांगितले. त्यानंतर शाह यांनी भावासोबत शहर पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण प्रकार सांगितला. शेवटी त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच पोलीस दलातील श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली. तसेच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.