शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यातच मतदानाचा टक्का ८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 12:30 IST

मनपा निवडणुकीत झाले होते ५७ टक्के मतदान

जळगाव : लोकसभेसाठी २३ रोजी झालेल्या मतदानात जळगाव शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत जळगाव शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. केवळ आठ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत ८ टक््क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाकडून विचारमंथन सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी यंदा जळगाव मतदार संघात भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत रंगलेली पहायला मिळाली. तसेच निवडणुकीआधी भाजपाकडून विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रचारादरम्यान अमळनेर येथे झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष व माजी आमदारांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर भाजपाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. त्यामुळे भाजपा नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांकडून मतदान काढण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा होती. मात्र शहरात भाजपाचे ५७ नगरसेवक असताना शहरात केवळ ४९ टक्के मतदान झाल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तापमानाचाही परिणाममनपा निवडणुकीच्या वेळेस पावसाळा असल्याने तापामान जास्त नव्हते. मात्र, २३ रोजी झालेल्या लोकसभेच्या मतदानावेळी ४२ अंश सेल्सीअस तापमान असल्यामुळे दुपारी १२ पर्यंत चांगले मतदान झाले. दुपारून मात्र मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर निघाले नाहीत.मनपाची पुनरावृत्ती न झाल्याने नगरसेवक झाले नाराजभाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत देखील मनपा निवडणुकीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होईल अशी अपेक्षा नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाने पैसेवाटप न करण्यावर भर दिला. तर काही ठिकाणी पैसे वाटपाचे काम बाहेरच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविल्यामुळे देखील नगरसेवक नाराज असल्याने नगरसेवकांनी आपल्या प्रभागात उपस्थित राहून केवळ औपचारिकता बजावल्याचे पहायला मिळाले. मतदान काढण्यासाठी नगरसेवकांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव