शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘डिओएम’चा इगो हर्ट; ‘राजधानी’त गोंधळ! गाडीला १४ मिनिटे विलंब : टीटीईची मद्याची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 06:18 IST

भुसावळ विभागाचे सिनियर डिओएम रामनिवास मीना शुक्रवारी राजधानी एक्सप्रेसने (क्र.२२२२१)ने नाशिकरोड येथून बोगी क्र. एच.१ ने बी कॅबिनमधून प्रवास करीत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भुसावळ रेल्वेचे सिनियर डिओएमना टीटीईने (तिकीट परीक्षक) बी कॅबिनमधून ए कॅबिनमध्ये जाण्यास सांगितल्यामुळे डिओएमना राग आला आणि दोघांमध्ये गाडीतच वादाची ठिणगी पडली. चिडलेल्या डिओएमनी  टीटीईवर मद्यप्राशनाचा आरोप करत त्यांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली, मात्र त्यात टीटीईने मद्यप्राशन केल्याचे सिध्द झालेच नाही. मानापमानाच्या नाट्यामुळे शुक्रवारी रात्री जळगाव स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला तब्बल १४ मिनिटे विलंब झाला. 

भुसावळ विभागाचे सिनियर डिओएम रामनिवास मीना शुक्रवारी राजधानी एक्सप्रेसने (क्र.२२२२१)ने नाशिकरोड येथून बोगी क्र. एच.१ ने बी कॅबिनमधून प्रवास करीत होते. तिकिट निरीक्षक (टीटीई) निखील राठोड यांनी मीना यांना ए कॅबिनमध्ये जाण्यास विनंती केली. त्यावर राठोड यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करत मीना यांनी भुसावळ कंट्रोल रुमशी संपर्क करुन जळगावाला ब्रेथ ॲनालायझर मागवले. 

अन्य टीटीई धावले मदतीलावरिष्ठ अधिकारी असल्याने स्टेशन मास्तरकडून सिग्नल दिला जात नव्हता. टीटीई ऑनड्युटी आहे, आणि रिपोर्टही निगेटिव्ह आहे. तुम्ही विभागीय कार्यवाही करु शकता, गाडी रवाना करावी ही आरपीएफची विनंतीही धुडकावून लावण्यात आली. या प्रकाराबद्दल गाडीतील अन्य टीसींनी संताप व्यक्त करुन राठोड यांना गाडीतून उतरविण्यास विरोध केला.

दरम्यान राठोड यांना अन्य कोचमध्ये लपविण्यात आले. मीना यांनी आरपीएफकडे लेखी रिपोर्ट दिला. त्यानंतर ९ वाजून १६ मिनिटांनी गाडी रवाना झाली. दरम्यान, या प्रकारावर आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

डिओएम यांचा बोलण्यास नकारया वादाच्या पार्श्वभूमीवर सिनियर डिओएम रामनिवास मीना यांच्याशी ‘लोकमत’ ने संपर्क साधला असता, गाडीतील वाद फार मोठा नव्हता. ब्रेथ ॲनालयाझर मशिनद्वारे संबंधित टीटीईची तपासणी करण्यात आली होती इतकेच बोलले.

का झाला वाद?टीटीई राठोड यांनी मीना यांना ओळखले नाही. ते ज्या कोचमध्ये होते, तेथे दरवाजा बंद करण्यास अडचणी येत होत्या, शिवाय अस्वच्छता होती व साफसफाई केली जाणार होती. अन्य कोचमध्ये जाण्यास सांगितल्यामुळे मीना यांना त्याचा राग आला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे