शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रावेर ग्रामीण रुग्णालयात ५० आॅक्सिजनयुक्त बेड उभारणीसाठी सरसावले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 17:49 IST

आॅक्सिजनअभावी रुग्णांना जळगाव व भुसावळ येथे पाठवावे लागत असल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेड असलेला आॅक्सिजनयुक्त वॉर्ड लोकसहभागातून उभारण्याची संकल्पना रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरलेल्या प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी मांडली.

ठळक मुद्देप्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या माध्यमातून अत्यवस्थेतील रुग्णांना जीवदान देण्यासाठी आरोग्यदूत आले धावूनभविष्यात तालुकावासीयांसाठी ही कायमची जीवदान देणारी सुविधा उपलब्ध होणार

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : कोरोनाच्या महामारीत आॅक्सिजनअभावी रुग्णांना जळगाव व भुसावळ येथे पाठवावे लागत असल्याने रावेर ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ५० बेड असलेला आॅक्सिजनयुक्त वॉर्ड लोकसहभागातून उभारण्याची संकल्पना तालुक्यातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरलेल्या प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी बुधवारी तहसील कार्यालयात मांडली. त्यास तालुक्यातील लोकप्रतिनिधी, व्यापारीवर्ग, डॉक्टरवर्गासह दातृत्वाची भावना असलेल्या दात्यांनी सढळ हात पुढे करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाबाधित रुग्णांच्या शरीरातील रक्तात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यास आॅक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांना भुसावळ तथा जळगाव येथील रुग्णालयात पाठवण्याची गरज भासत असते. या ४५ ते ७५ कि.मी. अंतर कापताना रुग्णांची प्राणहानी होण्याची शक्यता जास्त असते. रावेर ग्रामीण रुग्णालयातच आॅक्सिजनयुक्त ५० खाटांची तालुक्यातील जनतेच्या लोकसहभागातून उभारणी करण्याची संकल्पना प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी मांडली. किंबहुना, कोविड -१९ हे निमित्त असले तरी भविष्यात तालुकावासीयांसाठी ही कायमची जीवदान देणारी सुविधा उपलब्ध होणार असल्याने डॉ.थोरबोले मात्र खºया अर्थाने आरोग्यदूत ठरले आहेत.त्यांच्या या संकल्पनेवर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहंमद, उपनगराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरसेवक अ‍ॅड.सूरज चौधरी, नगरसेवक आसिफ मोहंमद, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, रावेरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ.दत्तप्रसाद दलाल, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.संदीप पाटील, सरपंच तथा कृउबा सभापती श्रीकांत महाजन, नेहता सरपंच महेंद्र पाटील, केºहाळे बुद्रूक येथील सरपंच राहूल पाटील, बलवाडीचे सरपंच तथा शहरातील व्यापारी वर्गातील कन्हैयालाल अग्रवाल, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, पं.स.सदस्य योगेश पाटील, मोतीराम खटवाणी, चेतक गिनोत्रा, किशोर तोलाणी आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.डॉ.थोरबोले यांनी आॅक्सिजनयुक्त ५० बेडसाठी अंदाजे साडेतीन लाख रु. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लोकसहभागातून हे शिवधनुष्य पेलण्यासाठी मोठे यश साध्य ठरणार असल्याचे समाजमनातून कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर