शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या वापरामुळे कापसावर दुष्परिणाम, वडली येथे शेतकऱ्यांचे नुकसान

By सुनील पाटील | Updated: July 16, 2023 18:04 IST

शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला.

जळगाव : रासायनिक खताच्या वापरामुळे तालुक्यातील वडली शिवारात कापूस पिकावर दुष्परिणाम जाणवू लागला आहे. पिकाची वाढ खुंटली असून पानांना गळती तसेच आकुंचित पावत आहे. या प्रकारानंतर कृषी विभागाने शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. खते पुरविणाऱ्या दुकानदाराकडील साठा सील केला आहे. खतांचे नमुने घेण्यात आले असून विश्लेषणासाठी नाशिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला. संजय बापू पाटील, किरण बापू पाटील, अवधूत माणिक पाटील, संतोष नामदेव कुंभार व साहेबराव ओंकार पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाची वाढ खुंटली, पाने पिवळी पडण्यासह ते आकुंचित पावले. खतांमुळेच हा प्रकार झाल्याचे लक्षात आले. जळगाव बाजार समितीचे संचालक अरुण लक्ष्मण पाटील यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, पंचायत समितीचे कृषि अधिकारी धीरज बढे, मंडळ कृषि अधिकारी मिलिंद वाल्हे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी पाहणी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली व पंचनामे केले.

खत पिकापासून लांब केले

गावातील कृषी केंद्रावरुन १५ टन खत विक्री झाले आहे. ते २६ शेतकऱ्यांनी घेतले आहे. या शेतकऱ्यांची यादी कृषी अधिकाऱ्यांनी घेतली. सहा शेतकऱ्यांच्या पिकावर दुष्परिणाम जाणवताच ज्या शेतकऱ्यांनी नुकताच खताचा मात्र दिला, त्यांनी लागलीच पिकापासून खत वेगळे करण्याचे काम हाती घेतले होते.  

गिरीश महाजनांच्या सूचना

जामनेर, बोदवड व जळगाव तालुक्यात कापूस पिकात रासायनिक खत टाकल्यानंतर कापूस पिकावर दुष्परिणाम दिसून आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी  जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सुचीत केले असून शेतकऱ्यांनी वापरलेल्या रासायनिक खतांचे नमुने तपासणी करता पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सहा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले आहेत. खतांचा साठा सील करण्यात आला आहे. नमुने नाशिक प्रयोग शाळेत पाठविले आहेत. १५ दिवसात अहवाल येईल. नियमानुसार जी नुकसान भरपाई देणे शक्य आहे, ती देण्यात येईल.-धीरज बढे, कृषी अधिकारी

टॅग्स :Jalgaonजळगाव