शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जादू- टोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:36 IST

अ‍ॅड.मुक्ता दाभोलकर : अंनिसच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६०० मानसिक रुग्णांना दिला आधार

सचिन देव ।जळगाव : समाजातील अंधश्रद्धा घालविण्यासाठी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून वेगाने काम सुरु आहे. कायदा झाल्यानंतर आतापर्यंत अंधश्रद्धेच्या नावाखाली राज्यभरात फसवणुकीचे ४५० च्या वर गुन्हे दाखल झाले आहेत. समाजातील सर्वच स्तराशी निगडीत असलेली अंधश्रद्धा घालविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. असे मत अंनिसच्या राज्य पदाधिकारी अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.रविवारी समता शिक्षक परिषदेतर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी त्या जळगावाल आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्याशी ही झालेली बातचीत.प्रश्न : जिल्ह्यात अंनिसतर्फे सध्या कुठले काम प्रभावीपणे सुरु आहे?उत्तर : जिल्ह्यातील ६०० च्या वर मनोरुग्णांवर उपचार करुन, त्यांना बरे करण्यात आले आहे. हे काम जिल्ह्यात चाळीसगाव येथे प्रभावीपणे काम सुरु आहे. अंनिसतर्फे डॉ. प्रदीप जोशी हे मनोरुग्णांवर मोफत उपचार करत आहेत. जिल्हाभरातील रुग्ण या ठिकाणी येत असतात. त्या रुग्णांवर उपचार करीत आहोत.प्रश्न : नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत?उत्तर : जादू-टोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार कायदा करण्यात आला आहे. त्याची शहर व ग्रामीण भागापर्यंत प्रभावी अंमल बजावणी करता येईल, याकडे नव्या सरकारने लक्ष द्यावे, मागील युतीच्या सरकारने अंधश्रद्धा निर्मुलनसाठी शााळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी परवानही दिली होती. तशी या नव्या सरकारनेही द्यावी,प्रश्न : अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अंनिसतर्फे येत्या काळात कुठले उपक्रम राबविण्यात येणार आहेत?उत्तर : कायदा लागू झाला असला तरी, अंधश्रद्धेच्या नावाखाली कुठेना-कुठे फसवणूकीचे प्रकार घडतातच. यासाठी अंनिसतर्फे मानस मित्र उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरुण-तरुणींना प्रशिक्षण देऊन, मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना मानसोपचार तज्ञांकडे नेऊन, त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.प्रश्न : अंनिसतर्फे महिला सबलीकरण अभियान घेण्यात येणार आहे, त्याचे स्वरुप नेमके काय आहे?उत्तर : सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ३ ते १२ जानेवारी या कालावधीत अंनिसतर्फे महिलांच्या समस्या जाणून घेणार आहेत. शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागात जाऊन महिलांच्या मासिक पाळी संदर्भात गैरसमज दूर करणार आहेत.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव