शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक धोरणाची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी आवश्यक : अ‍ॅड.रवींद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 20:22 IST

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण क्षेत्रावरही त्याचा विपरीत परिणाम झाला असल्याने यापुढे शिक्षण व आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून त्याचा लाभ सर्वांना मिळावा याकरिता त्याची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्राचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी केले.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित परिसंवादात डॉ.जगदीश पाटील व डॉ.मनीषा जगताप यांनी साधला संवादनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित परिसंवाद

भुसावळ : गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण क्षेत्रावरही त्याचा विपरीत परिणाम झाला असल्याने यापुढे शिक्षण व आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून त्याचा लाभ सर्वांना मिळावा याकरिता त्याची प्रभावी व सकारात्मक अंमलबजावणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्राचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जळगाव जिल्हा केंद्रातर्फे आयोजित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित परिसंवादात उद्घाटनपर मनोगतात अ‍ॅड.पाटील बोलत होते.प्रारंभी परिसंवादाचे समन्वयक श्यामकांत रूले मुक्ताईनगर यांनी आयोजनाचा हेतू सांगून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी शालेय शिक्षण या विषयावर बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचार व सृजनशक्तीला वाव देण्याबरोबरच त्यांची अध्ययन निष्पत्ती व क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने धोरणात नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांनी मागील दोन्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा आढावा घेऊन नवीन धोरणाची ध्येय व वैशिष्ट्ये सांगितली. सार्वत्रिक प्रवेश, नवीन शैक्षणिक रचना, पायाभूत शिक्षण, अभ्यासक्रम, मूल्यमापन, महत्त्वाची क्षेत्रे, बहुभाषिकत्व याविषयी कस्टम अ‍ॅनिमेशनद्वारे पीपीटी सादरीकरण केले. त्यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा.डॉ.मनीषा जगताप यांनी उच्च शिक्षण या विषयावर संवाद साधताना मागील धोरणांचा उच्च शिक्षणासंदर्भात आढावा घेऊन नवीन शैक्षणिक धोरणात झालेले आमूलाग्र बदल सांगितले.समाजाभिमुख व कौशल्यावर आधारित उच्च शिक्षण देऊन रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊलवाट निर्माण केली जाणार आहे. नवीन धोरणामुळे शैक्षणिक विकास व विविध रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यासंदर्भातही त्यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले.परिसंवादाविषयी प्रा.श्रीकांत जोशी यावल, डी.के.पाटील रावेर व अनिता पाटील जामनेर यांनी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी हा परिसंवाद लाभदायी ठरला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जळगाव जिल्हा केंद्राचे सचिव प्रा.डॉ.सुनील पाटील यांनी परिसंवादातील माहितीमुळे शैक्षणिक धोरणाचे विश्लेषण झाल्याचे सांगून अशा प्रकारचे विविध नावीण्यपूर्ण उपक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने राबविणार असल्याचे आश्वासन दिले.सूत्रसंचालन परिसंवाद समन्वयक श्यामकांत रूले मुक्ताईनगर यांनी तर आभार सचिव प्रा. डॉ. सुनील पाटील जळगाव यांनी मानले. झूम अ‍ॅप व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पार पडलेल्या या वेबिनार परिसंवादाचा हजारो श्रोत्यांनी लाभ घेतला.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ