भुसावळ तालुक्यातील कुºहा शाळेत शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 04:40 PM2019-09-08T16:40:26+5:302019-09-08T16:41:19+5:30

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘एक दुर्वा समर्पणा’ची उपक्रम राबवला जात आहे.

Educational Literature in Kusha School in Bhusawal taluka | भुसावळ तालुक्यातील कुºहा शाळेत शैक्षणिक साहित्य

भुसावळ तालुक्यातील कुºहा शाळेत शैक्षणिक साहित्य

Next
ठळक मुद्देएक दुर्वा समर्पणाची उपक्रमजिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

भुसावळ, जि.जळगाव : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘एक दुर्वा समर्पणा’ची उपक्रम राबवला जात आहे. त्यात शनिवारी कुºहा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच रामलाल बडगुजर होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अब्दुल मोया, हमीद शेख, इस्माइल मन्यार, इम्रान पिंजारी, नबाब खाटीक, मुख्याध्यापक रिजवानखान, शिक्षिका रुबिना परवीन, कुºहे बॉइज स्कूलच्या मुख्याध्यापिका उषा सोनवणे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. अंतर्नादचे सल्लागार ज्ञानेश्वर घुले, उपाध्यक्ष जीवन सपकाळे, योगेश इंगळे, श्रीकांत बरकले, प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे, समन्वयक अमितकुमार पाटील यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरजू ५० विद्यार्थ्यांना पाट्या, पेन्सील, वह्या असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गणेशोत्सवात खर्चात बचत करून त्यातून घेतलेले शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा हा उपक्रम पथदर्शी आहे. वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरेल, अशी भावना सरपंच रामलाल बडगुजर यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केली.
उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून गणेशोत्सवाला या सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील हे स्वत: आणि मित्रमंडळींच्या सहकायार्ने गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. यंदा तिसरे वर्ष आहे.
दरवर्षी नवीन शाळांची निवड
उपक्रमांतर्गत दरवर्षी ग्रामीण भागातील नवीन शाळांची निवड केली जाते. यंदा कुºहा येथील उर्दू शाळेपासून सुरुवात करण्यात आली. आणखी तीन ते चार शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे, समन्वयक अमितकुमार पाटील यांनी दिली.

Web Title: Educational Literature in Kusha School in Bhusawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.