शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणाऱ्या अभियंत्यासह दोघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:02 IST

पंचांच्या साक्ष महत्त्वपूर्ण

ठळक मुद्देपाचोरा येथे इशा-यावर स्विकारली होती रक्कमतीन वेळा केला इशारा

जळगाव : वीज बील दुरुस्त करुन देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरण कंपनीचे पाचोरा येथील सहायक अभियंता जितेंद्र कडुबा गोरे व कनिष्ठ तंत्रज्ञ ऋषीकेश भिकन सूर्यवंशी यांना न्यायालयाने शनिवारी अनुक्रमे ४ व ३ वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.याबाबत अधिक माहिती अशी की, लोहारा, ता.पाचोरा येथील शांताराम दगडू बेलदार यांच्या दुकानाचे वीज बील जादा आले होते. ते दुरुस्त करुन मिळावे यासाठी ते पाचोरा येथे महावितरणचे सहायक अभियंता जितेंद्र कडुबा गोरे यांच्याकडे गेले होते. गोरे यांनी बील दुरुस्त करुन देण्यासाठी बेलदार यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती.त्यामुळे बेलदार यांनी ९ जानेवारी २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अतिशय पद्धतशिरपणे सापळा रचून या विभागाने ही कारवाई केली.तीन वेळा केला इशारातक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आर.पी.माळी दोन शासकीय पंचांना घेऊन पाचोरा उपविभागीय कार्यालयात गेले होते. तेव्हा गोरे यांनी एक बोट दाखवून एक हजार रुपये देण्याची मागणी केली.त्यानंतर थोड्यावेळाने शेजारी बसलेले कनिष्ठ तंत्रज्ञ सूर्यवंशी यांच्याकडे ही रक्कम देण्याचा इशारा केला होता. थोड्यावेळाने सूर्यवंशी यांनीही एक हजार रुपये डाव्या खिशात टाकण्याचा बोट दाखवून इशारा केला. पैसे दिल्यानंतर जागेवरच पंचनामा करण्यात आला.पंचाच्या साक्षी महत्वपूर्णन्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात सरकारतर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. तक्रारदार शांताराम बेलदार, पंच सुजय लांडगे (जि.प.जळगाव), खटला दाखल करण्यासाठी परवानगी देणारे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ.मुरहरी सोपानराव केळे (मुंबई) व तपासाधिकारी आर.पी. माळी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड.आर.के. पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अनिल रामचंद्र सपकाळे यांनी महत्वाची भूमिका यात बजावली.असे कलम, अशी शिक्षाजितेंद्र कडुबा गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक कलम ७ प्रमाणे ३ वर्ष शिक्षा, एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १ वर्ष कैद. कलम १३ प्रमाणे ४ वर्ष कैद व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा दिली आहे. तसेच तंत्रज्ञ ऋषीकेश भीकन सूर्यवंशी याला लाचलुचपत प्रतिबंधक कलम १२ प्रमाणे ३ वर्ष शिक्षा, एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १ वर्ष कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव