शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने - नीलेश विकमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:18 IST

देशाचे भविष्य बदलविण्याची ताकद सी.ए.अभ्यासक्रमात

ठळक मुद्देराष्ट्रीय वृद्धीदरावरही परिणाम नाहीसनदी लेखापालांची गरज वाढतेयतंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - नोटाबंदी असो अथवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली असो, यामुळे भविष्यात चांगले परिणाम दिसणार आहे. यामुळे कोणताही परिणाम झाला नसून देशाची अर्थव्यवस्था योग्य पातळीवर असल्याचे आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीलेश विकमसे यांनी सांगितले.  नवीन कायद्यांमुळे चुकीचे काम करणा:यांना करांची भीती आहे, मात्र प्रामाणिक व्यक्तीला याची काहीही चिंता राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली.  रिंगरोडवरील आयसीएआय भवन येथे 27 सप्टेंबर रोजी जळगावशाखेला त्यांनी सदिच्छा भेटी दिली, त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सेंट्रल कौन्सिलचे सदस्य  मंगेश किनारे,  अनिल भंडारी, प्रफुल्ल छाजेड, सर्वेश जोशी, जळगाव शाखेच्या चेअरमन पल्लवी मयूर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 दहा वर्षांनी सी.ए.च्या नवीन अभ्यासक्रमाची रचना होत असते. त्यात आता अर्थव्यवस्थेत व प्रशासकीय रचनेत सनदी लेखापालांची गरज वाढत आहे. त्यामुळे गरीब, श्रीमंत, युवक-युवती, कोणतेही आरक्षण असा भेदभाव नसलेला, सर्व समानता असलेला व भविष्यात अधिक उत्पन्न देणारा सी.ए.अभ्यासक्रम तयार कण्यात आला असून यामुळे विद्याथ्र्याना उज्‍जवल भविष्याच्या संधी असल्याचे विकमसे यांनी सांगितले. 

नोटाबंदीनंतर राष्ट्रीय वृद्धीदर कमी झाला असे वाटत असले तरी हा दर नोटाबंदी अथवा जीएसटीमुळे कमी झाला नसून तो आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम असल्याचे विकमसे यांनी स्पष्ट केले.

आयसीएआयने आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठे काम केले असून जी.एस.टी.विषयी जनजागृती व पुस्तके प्रकाशित केली आहेत. आयसीएआयला रेल्वे विभागाची अर्थविषयक जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. संस्थेने डिजिटल अकौन्टन्सी बोर्ड तयार करुन तंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी केली आहे. कॅनडासारख्या देशात 12 हजार चार्टर्ड अकौन्टटची गरज असताना तिथे केवळ सहा हजार चार्टर्ड अकौन्टटंची उपलब्धता आहे. त्यामुळे आपल्या देशातील चार्टर्ड अकौन्टंटला देश विदेशात मोठय़ा संधी उपलब्ध असणारे हे करिअर असल्याचे विकसने यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जळगाव शाखेचे उपाध्यक्ष अजय जैन, मानद सचिव स्मिता बाफना, पंकज अग्रवाल, माजी अध्यक्ष नितीन झंवर, निरंजन दोशी, जयेश दोशी, शेखर सोनाळकर आदींची उपस्थिती होती.