भुसावळ : भारत देशाची लोकशाही ही सर्वात बळकट अशी लोकशाही असून यामध्ये हे सर्वांनाच सामावून घेतलेले आहे संविधानाने दिलेल्या मूलभूत हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार मिळाल्याने मुक्तपणे वावर करू शकतो परंतु कॅश कास्ट आणि क्राईम हे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे. यापासून लवकर मुक्त होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळतर्फे ‘द्वंद जीवनाचे’ या आॅनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते.प्रास्ताविक रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे यांनी केले. अरुणभाई गुजराथी यांचा परिचय सुनील वानखेडे यांनी करून दिला.यावेळी अरुणभाई गुजराथी म्हणाले, डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपली लोकशाही ही चार खांबांवर ती मजबूतपणे उभी आहे. यामध्ये संसद प्रशासन पत्रकारिता व न्यायालय हे चार खांब असून यामुळे लोकशाहीला बाधा अद्याप तरी नाही. संसद या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही ही संसदेमध्ये हे समान अधिकार असून दोघांमध्ये संवाद घडणे गरजेचे आहे आपले सरकार सीआर, जीआर, व एफआयआर यावर चालते प्रत्येक घटक त्याची त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावत असून यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे काम हे संसदेचे असून ते पूर्ण करण्यासाठी विधानसभा पूर्णवेळ चालली पाहिजे लोकशाहीला कॅश कास्ट व क्राईम हे लागलेले ग्रहण असून ते ग्रहण सुटले पाहिजे अन्यथा लोकशाहीला बाधा निर्माण होऊ शकते लोकशाहीमध्ये मतदार यांची भूमिका महत्त्वची असून त्यांनी योग्य भूमिका बजावणे गरजेचे आहे.सूत्रसंचालन रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीचे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी तर आभार प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेक्रेटरी राम पंजाबी, प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे व कोआॅर्डिनेटर जीवन महाजन यांनी परिश्रम घेतले.
लोकशाहीला कॅश, कास्ट आणि क्राईम हे लागलेले ग्रहण-अरुणभाई गुजराथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:21 IST