शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रापासून साकारणार इको फ्रेण्डली मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:36 IST

उपक्रम : संस्कृती फाउंडेशनचा यंदा पर्यावरण पूरक १० फूट उंच गणराय

भुसावळ, जि.जळगाव : संस्कृती फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्यात येणार आहे. यंदा वृत्तपत्राच्या कागदापासून १० फूट उंचीची इको फ्रेण्डली गणेश मूर्ती बनविण्यात येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे करण्यात येत आहे.यंदा भुसावळकरांना संस्कृती फाउंडेशनचा आगळा वेगळा गणपती बघायला मिळणार आहे. गणपती संपूर्ण वृत्तपत्राच्या कागदापासून बविण्यात येत असून, सुमारे १० किलो वृत्तपत्राची रद्दी यासाठी वापरण्यात आलेली आहे. ह्या गणपतीचे आगमनसुद्धा पारंपरिक पद्धतीने केले जाईल आणि हा गणपती डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात स्थापित केला जाणार आहे. उद्यानात संपूर्ण ठिकाणी पर्यावरणाचे संदेश देण्यात येणार आहे आणि जनजागृती केली जाणार आहे. गणपतीचे दर्शन करणाऱ्या भाविकांना कापडी पिशवी भेट दिली जाणार आहे.गणपती हा सात दिवसांचा असून त्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या संदेशातून प्रबोधन केले जाणार आहे.विसर्जनासाठी निघणार जनजागृतीपर दिंडीपारंपरिक पद्धतीने दिला जाणारा गणपतीला निरोप आठव्या दिवशी गणपतीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहे. ह्यात पर्यावरण व स्वच्छता जनजागृतीपर दिंडीचे आयोजण करण्यात येणार आणि माधवाश्रमासमोरील महाराणा प्रताप चौकात पर्यावरण संवर्धनावावर कीर्तन होईल. त्याच ठिकाणी आमदार संजय सावकारे व रजनी सावकारे यांच्या हस्ते गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे.आठव्या दिवशी दिंडीची सुरवात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून होईल. यात नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी तसेच विविध मान्यवर व नगरसेवक यांचा समावेश असेल.कार्यकर्त्यांकडून मूर्र्तींची घडणभुसावळ शहरात नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती व्हावी ह्याच अनुषंगाने हा आगळ्या वेगळ्या गणपतीची स्थापना केली जाणार आहे. गणपती मूर्तीची निर्मिर्तीसाठी स्वत: संस्कृती फाउंडेशनचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ