शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:55 IST

जि.प.चे सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांचा संकल्प

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत

हितेंद्र काळुंखे ।जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील यांनी काही दिसांपूर्वीच कार्यभार स्विकारला आहे. या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा त्यांनी घेतलेला आढावा तसेच पुढील नियोजन या विषयी जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: जिल्हा परिषदेच्या कामकाजविषयी काय वाटते?उत्तर: कामकाज अधिक गतिमान व पारदर्शी करण्याची आवश्यकता वाटते. यासाठी लवकरात लवकर ई- आॅफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक कामकाजाची फाईल ही ई माध्यमातून तयार होवून फाईलचा प्रवास आदी माहिती हे संबंधिताना पाहणे सहज होईल. अर्थात कामाची गती आणि पारदर्शकताही वाढेल.प्रश्न: यापूर्वी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. अधिकारी हे पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाही.परिणामी कामे रखडतात अशी तक्रार असते?उत्तर: अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असला तरच कारभार सुरळीत चालू शकतो. यादृष्टीने आपला समन्वय राखण्याचा नेहमीच प्रयत्न राहील.प्रश्न: नुकताच जिल्हा परिषदेचा १४ कोटीचा निधी परत गेला व गेल्या वर्षात कामांच्या नियोजनालाही उशीर झाला, यास जबाबदार कोण?उत्तर: परत गेलेला निधी हा काही वर्षामधला असून यापुढे कामांचे नियोजन वेळच्यावेळी करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित राहील. माझ्याकडून विलंब होवू देणार नाही.प्रश्न :विविध योजना कशा राबविल्या जात आहेत ?उत्तर:शासनाच्या विविध योजना व दिलेले उद्दीष्ट हे पूर्ण केले जात आहे. आपणही पदभार स्विकारल्यानंतर याकडे विशेष लक्ष दिले आहे. गेल्या ४ वर्षात३२९७८ घरकुले मंजूर करण्यात आली.आजपर्यत २२६४८ घरकुलेपूर्णझालीत. मागील ६ महिन्यात विशेष पाठपुरावा करुन १२हजारपेक्षा अधिक घरे पूर्ण करण्यात आली.ग्रामीण भागातील ५७६३ कुटुंबांना स्वत:ची जागा नसल्याने गावठाण व शासकीय जागा घरकुलासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडीत दिनदयाल योजनेतून १,६३,७४३०० इतका खर्च करण्यात आला. दोन वर्षात १६६४३७ शौचालये पूर्ण करण्यात आली. यामुळे जिल्हा हगणदरीमुक्त झाला.ग्रामीण भागातील विविध अतिक्रमणे नियमित करण्याबाबत आदेश दिले होते.यानुसार १०,३३१ अतिक्रमणे नियमीत करण्यात आलीत. १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले. याचबरोबर कर्मचारी व शिक्षकांसाठी एक नवे अ‍ॅप तयार केले जात आहे. -डॉ.बी. एन.पाटील

टॅग्स :interviewमुलाखत