शिरपूर : ‘आय एम आयपीएस आॅफिसर’ असे म्हणतच रविवारी रात्री एक तरुण पोलीस ठाण्यात आला़ ड्यूटीवर असणार्या पोलिसांनी उभे राहून त्याला अदबीने सॅल्यूटही ठोकला़ त्यानंतर त्यास मांसाहारी जेवणाची सोय केल्यानंतर एका वातानुकूलित लॉजमध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली़ सोमवारी सकाळी पुन्हा पोलीस ठाण्यात आल्यानंतर अवैध वाहतुकीच्या गाड्या कायदेशीर न सोडता बेकायदेशीर सोडत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसाचा संशय बळावला़ पोलिसांनी त्याची यथेच्छ धुलाई केली़ मात्र यासंदर्भात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही़ फुकट फौजदार तामसवाडीचा रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जीन्स पँन्ट, पांढरा शर्ट व मिलिट्री कट केलेल्या अंदाजे ३०-३५ वयोगटातील तरुणाने शिरपूर पोलीस ठाण्यात धडाकेबाज एन्ट्री करून ‘आय एम आयपीएस आॅफिसर’, हू आर यू संभाजी पाटील गोर्इंग यासह अनेक इंग्रजी वाक्यांचा वापर केल्याने उपस्थित तिघा-चौघा पोलिसांची धांदल उडाली़ तो आॅफिसर असल्याचे समजून त्याचा सन्मान करण्यात आला़ रात्री करवंद नाक्यावरील गार्डनमध्ये फिरण्यासाठी नेण्यात आले़ मांसाहाराचा बेत झाल्यानंतर एका वातानुकूलित लॉजमध्ये त्याची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली़ पोलिसांनी रविवारी ४-५ वाहने पकडली होती़ १९ रोजी सकाळी पुन्हा तो अधिकारी पोलीस स्टेशनला येऊन वाहनचालकांवर रुबाब झाडत होता़ तशातच त्याने ठाणे अंमलदाराला रुबाबात एक गाडी सोडून दे, असे फर्मान काढले. तिथेच संशय बळावला. उलट तपासणीत हा तोतया अधिकारी जळगाव जिल्ह्यातील तामसवाडीचा रहिवासी असल्याचे समजते़ मात्र त्याचे नाव समजू शकले नाही़ असे असले तरी एका युवकास पोलिसांनी बसवून ठेवले आहे़
तोतया आयपीएसच्या दिमतीची ड्यूटी!
By admin | Updated: May 20, 2014 01:05 IST