शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १,३५१ गुन्ह्यांची नोंद, तर ५५३ संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 21:21 IST

राज्य उत्पादन शुल्काची कारवाई : दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने मागील वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर, २०२० या कालावधीत अवैध मद्यविक्री विरोधात राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत १ कोटी ९८ लाख २९ हजार ३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे या वर्षभरात एकूण १,३५१ गुन्हे नोंदविलेले असून, यामध्ये वारस-५३९, बेवारस-८१२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ५५३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोहाफुले १०० किलो, हातभट्टी दारू १८,१७३ लीटर, देशी मद्य ११०३.०९ ब.ली., विदेशी मद्य १८०७.०३ ब.ली., बीअर १०९.२९ ब.ली. तसेच बनावट देशी मद्य ४२३.३६ ब.ली. बनावट विदेशी मद्य २५.९ ब.ली., परराज्यातील मद्य ९.७५ ब.ली., बनावट ताडी ५६१ लीटरचा समावेश आहे. यात ५५ दुचाकी व ६ चारचाकी वाहनांचाही समावेश असून, वर्षेभरात १ कोटी ९८ लाख २९ हजार ३१ रपये इतक्या रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ग्रा.पं. निवडणूक काळात ३४ गुन्ह्यांची नोंदजिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळातही विभागाने १ ते १३ जानेवारी, २०२१ या १३ दिवसांमध्ये एकूण ३४ गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये वारस १४, बेवारस २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण १९ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर देशी, विदेशी दारू, तसेच ३ दुचाकी वाहने, एक (टाटा सुमो) चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख ७४ हजार ६२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बनावट दारूचे कारखाने उद्ध्वस्तनिवडणूक काळात तीन बनावट दारूचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील कारवाईत बनावट विदेशी मद्य तयार करण्याकरिता लागणारे साहित्य स्पिरिट, ३ बॉटलिंग मशिन, हायड्रोमीटर, विदेशी मद्याचा तयार ब्लेंड, बुचे रिकाम्या बाटल्या, तसेच मद्यार्क ३५० ब. ली., बनावट देशी, विदेशी मद्य ८५० ब.ली., एक दुचाकी वाहन व तीन चारचाकी वाहने असा एकूण २० लाख ६१ हजार ९९१ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.विशेष भरारी पथकाची नियुक्ती जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाकडून अवैध मद्य विक्रीवर आळा बसण्यासाठी जिल्ह्यात एक विशेष भरारी पथक व इतर पाच पथके नियुक्त करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव