शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणींसोबत पार्टी करणाºया संशयितांना न्यायालयातून परत नेल्याने संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:31 IST

राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवरील पार्टी

ठळक मुद्देतीन आयपीएस अधिकारी असताना कागदपत्रात त्रुटी कशा?फार्महाऊस मालकावर कारवाई नाहीच
जळगाव : ममुराबाद रस्त्यावरील एका राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवर महिलांचे बिभत्स नृत्य व दारु पार्टी करताना पकडण्यात आलेल्या सहा महिला व १८ पुरुष अशा २४ जणांना पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाई करुन या सर्व संशयितांना मंगळवारी दुपारी बारा वाजता न्यायालयात आणण्यात आले. दोन तास थांबल्यानंतर या सर्वांना पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने या प्रकरणात संशयकल्लोळ निर्माण झाला. दरम्यान, मंगळवारी दिवसभर यावर खल सुरु होता. तरीही कागदपत्रांमध्ये त्रुटी राहिल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. एका मंत्र्याच्या जवळच्या राजकीय नेत्याचा हा फॉर्महाऊस आहे. यात अनेक बडे मासे असल्याने दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी सोमवारी रात्री दोन वाजता ममुराबाद रस्त्यावरील शेतातील फार्महाऊसवर धाड टाकली होती. त्यात सहा तरुणींसह १८ पुरुष अशा एकूण २४ जणांना पकडून तालुका पोलीस स्टेशनला आणले. मंगळवारी या सर्वांना बारा वाजता न्यायालयात आणले. न्यायालय आवारातील आरोपी कक्षात संशयितांना दोन तास बसवून ठेवण्यात आले. न्यायाधीशांसमोर हजर न करताच या सर्वांना पुन्हा माघारी तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस निरीक्षक किंवा जबाबदार अधिकारी न्यायालयात आलेच नाही तर दुसरीकडे राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची गर्दी होत होती व त्यांच्याकडून सूत्र हलविण्याचे काम सुरु असल्याने या प्रकरणात अधिकच संशय बळावला होता.पोलीस अधिकाºयांच्या बैठकाआरोपींना न्यायालयातून पोलीस स्टेशनला नेल्यानंतर त्या दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्याकडे दोन वेळा तर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या दालनातही बैठका झाल्या. दुपारी व सायंकाळी उशिरापर्यंत बैठकांचे सत्र चालले. त्यानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात आणण्यात आले.राजकीय दबाब अन् प्रतिबंधात्मक कारवाईदिवसभराच्या घडामोडी पाहत या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव आल्याची चर्चा होती. त्यामुळे या संशयितांवर गुन्हा दाखल न करता मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार ११०, ११७ अन्वये कारवाई करण्यात आले. या कलमान्वये संशयितांना अटकही करता येत नाही, दंडात्मक कारवाई करुन त्यांची सुटका होते. राजकीय दबावातून प्रतिबंधात्मक कारवाईवर निभावण्यात आल्याची जोरदार चर्चा या प्रकरणात झाली. या दिवसभराच्या घडामोडीत पोलिसांचीही चांगलीच फरफट झाली.राजकीय नेते, पदाधिकाºयांची भागम्भागया कारवाईमुळे राजकीय नेते व काही पदाधिकाºयांची चांगलीच भागम्भाग झाली. मनपाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, माजी महापौर अशोक सपकाळे, बजरंग दलाचे ललित चौधरी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने न्यायालयात व तेथून न्यायाधीशांच्या निवासस्थानाबाहेर आले होते. तेथून ते परत न्यायालयात आले होते. या साºया प्रक्रियेत सर्वांचीच भागम्भाग झाली.असा चालला चोर- पोलिसांचा खेळरात्री दोन वाजता संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर बारा वाजता न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर न करता सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दुपारी साडे चार वाजता एका वाहनातून सर्वांना न्यायालयाकडे नेण्यात आले, मात्र रस्त्यातच जिल्हा क्रिडा संकुलाजवळ पोलीस वाहन थांबविण्यात आले. एक तास रस्त्यात थांबल्यानंतर या सर्वांना वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसरीकडे संशयितांच्या दिमतीला वकीलांची फौज व त्यांचे राजकीय समर्थक न्यायालयात प्रतीक्षा करीत होते. अचानक या सर्वांना सायंकाळी साडे सात वाजता न्यायाधीशांच्या घरी नेण्यात आले. आरोपींची संख्या, माध्यमांच्या प्रतिनिधींचा ताफा व समर्थकांची गर्दी पाहता न्यायाधीशांनी घरी कामकाजास नकार देत सर्वांना न्यायालयातच नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आठ वाजता पुन्हा आरोपींचे वाहन न्यायालयात आले. कागदपत्रांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनीच आपल्या अधिकारात समजपत्र देऊन या सर्वांची सुटका केली व बुधवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावले. फार्महाऊस मालकावर कारवाई नाहीचपोलिसांनी कारवाई करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप होत आहे. ज्या फार्म हाऊसवर हे बिभत्स नृत्य व दारु पार्टी सुरु होती, त्या फार्म हाऊसच्या मालकावर कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नाही. बड्या राजकीय व्यक्तीचे हे फार्महाऊस असल्यानेच त्यांच्यावर कारवाई टाळण्यात आल्याची चर्चा आहे. अवैध धंदे व किरकोळ हातगाडी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना बड्या धेंड्यापुढे पोलीस नांग्या टाकत असल्याची टीका या घटनेमुळे होऊ लागली आहे. तीन आयपीएस अधिकारी असताना कागदपत्रात त्रुटी कशा?कागदपत्रांमधील त्रुटीचा आधार घेत पोलिसांनीच आपल्या अधिकारात ताब्यात घेतलेल्या संशयितांना रात्री ९ वाजता सोडून दिले. अर्धी रात्र व संपूर्ण एक दिवस हातात असताना, शिवाय तीन आयपीएस अधिकारी असताना कागदपत्रांमध्ये त्रुटी कशा राहतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसभर पोलीस स्टेशन, न्यायालय व न्यायाधीश निवासस्थान असे आरोपींना फिरविल्यानंतर रात्री ९ वाजता कागदपत्रात त्रुटी राहिल्याचे उघड होणे म्हणजेच संशयाला जागा निर्माण झाली आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी