शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे ज्येष्ठ नागरिक ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 20:42 IST

लसीकरणासाठी उसळली गर्दी : तिसरा मजला चढणे ज्येष्ठांना ठरतेय कष्टदायक

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू असून बुधवारी लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दिवसभरात दोन ते तीन वेळा पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणींचा खोडा निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तासन् तास ताटकळत बसावे लागल्याचा प्रकारही घडला.केंद्र शासनाने साठच्यावर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोफत केले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर बोलविले जाते. परिणामी, सुमारे पन्नास पायऱ्या चढून जाणे हे ज्येष्ठ नागरिकांना कष्टदायक जात आहे. त्यातच बुधवारी लसीकरणासाठी केंद्रात ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती. टोकन दिल्यानंतर त्यांना लसीकरण केले जात होते. मात्र, दिवसभरात दोन ते तीन वेळा पोर्टल बंदची समस्या उद्भवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणासाठी आलो होतो, सायंकाळी क्रमांक लागल्याचा एका वृध्दाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्याची मागणी होत आहे.लसीकरण केंद्र दुसरीकडे हलविण्याच्या हालचालीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लसीकरण केंद्र सुरू आहे. तिसऱ्या मजल्यावर केंद्र असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात लसीकरण केंद्र दुसरीकडे हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. लसीकरण केंद्रासाठी शहरातील काही केंद्रांची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव