जळगाव : शासनाने मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी झालेल्या मनपा महसभेने देखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे मनपाकडून जानेवारी २०२० पासून २ हजार ६०० कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. यामुळे मनपाच्या तिजोरीवर प्रत्येक महिन्यात १ कोटी ७५ लाख रुपयांचा अतिरीक्त भार पडणार आहे.राज्य शासनाने ६ महिन्यांपुर्वी मनपा कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. तसेच राज्यातील सर्व महापालिकांना आपआपल्या आर्थिक स्थितीप्रमाणे या आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मनपावर हुडको, जिल्हा बॅँकेच्या कर्जामुळे महापालिकेला कर्मचाºयांचे वेतन देखील वेळेवर करता येत नव्हते. अशा परिस्थितीत वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे मनपाला शक्य नव्हते.मात्र, हुडको, जिल्हा बॅँकेच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे अखेर मनपा प्रशासनाने मनपा कर्मचारी व पेन्शनर्सला सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शुक्रवारी महापालिकेच्या महासभेने देखील या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.मनपाकडून केले जातेय नियोजनमनपाच्या तिजोरीवर सातव्या वेतन आयोगामुळे १ कोटी ७५ लाख रुपयांचा भार पडणार आहे. मनपाचे सेवानिवृत्त व विद्यमान कर्मचारी मिळून एकूण २ हजार ६०० कर्मचारी आहेत. या कर्मचाºयांच वेतनावर सध्या ७ कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या रक्कमेत वाढ होणार असून ही रक्कम ८ कोटी ७५ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे मनपाकडून या खर्चाचे नियोजन केले जात आहे.शासनाकडे पाठविला जाईल प्रस्तावमहासभेने मंजुरी दिल्यानंतर हा ठराव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शासनाकडून या ठरावाची मंजुरी दिल्यानंतर मनपात सातवा वेतनाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जानेवारी २०२० पासून मनपा कर्मचाºयांना या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता अहे.मनपामध्ये वॉटरग्रेस कंपनीमार्फत सफाई कामाचा मक्ता सुरु आहे. यामध्ये कंत्राटी सफाई कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असून कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचे पत्र अखिल भारतीय मजदूर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण चांगरे मनपा प्रशासनाला दिले होते. याबाबत बुधवारी मनपा उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. किमान वेतनानुसार कंत्राटी सफाई कामगारांना देखील वेतन व विशेष भत्त्त्ता दिला जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती चांगरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. या बैठकीत मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप चांगरे आदी उपस्थित होते.
सातवा वेतन आयोगामुळे मनपाच्या तिजोरीवर पावणे दोन कोटींचा बोझा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:15 IST