शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कामामुळे वाहनधारकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:59 IST

लेंडी नाल्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम प्रशासनाने अर्धवटच सोडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय ...

लेंडी नाल्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम प्रशासनाने अर्धवटच सोडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. दरवर्षी पावसाळ््यात कांचनगरातील चौगुले प्लॉट समोरील, या लेंडी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहायचे. या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे, पाऊस पडल्यावर काही वेळातच पुलावरुन पाणी व्हायला सुरुवात व्हायची. यामुळे पुलावरील पाणी कमी होईपर्यंत, वाहतूक ठप्प होत असे. यासाठी महापालिकेतर्फे नुकताच या नाल्यावर दहा ते बारा फुट उंचीचा पूल बांधण्यात आला आहे. सध्या पूलाचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम मात्र अपूर्ण आहे. मनपा प्रशासनाने पुलाच्या उभारणीनंतर लगेच या रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम करायला हवे होते. मात्र, मुरुम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे. टाकलेला हा मुरुम पावसाळ््यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तसेच या रस्त्यावर पावसाळ््यात खड्डेदेखील पडण्याची शक्यता आहे. सध्या शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे, शिवाजीनगरातील नागरिक या मार्गेच वापर करत आहेत. यामुळे या पुलावर सकाळपासूनच वाहनांची वर्दळ वाढत आहे. वाहनांची वर्दळ लक्षात घेता, प्रशासनाने मुरुम टाकण्याऐवजी काँक्रिटीकरणाचा रस्ताच करायला हवा. कदाचित पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेला मुरुमाचा भराव वाहून गेला तर, पावसाळ््यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतील. तसेच यावेळी कॉक्रीटीकरणाचेदेखील काम करता येणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने संभाव्य धोके लक्षात घेऊन, हा रस्ता पक्का तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान हाल तरी थांबतील.- सचिन पाटील, रहिवासी.

टॅग्स :Jalgaonजळगाव