शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वीज बिलांमुळे जिल्हा परिषदेच्या डिजीटल शाळा आल्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:06 IST

जळगाव : वीज थकबाकी मुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. यामुळे डिजीटल शाळांचे अस्तित्व धोक्यात ...

ठळक मुद्दे बील भरण्याची जबाबदारी आता ग्रामपंचायतीकडे

जळगाव : वीज थकबाकी मुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. यामुळे डिजीटल शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्ह्यात या वीज बिलांची सुमारे ७७ लाख इतकी थकबाकी अहे. दरम्यान वीज बिलाच्या थकबाकीवर उपाय म्हणून शाळांचे वीज बिल हे ग्राम पंचायतींनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावे, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.स्पर्धेत टिकण्यासाठी डिजीटल शाळाजिल्हा परिषदेच्या शाळांकडे अनेक विद्यार्थी दर्जाअभावी पाठ फिरवत असल्यामुळे इतर खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधी तसेच लोकसहभागातून अनेक ठिकाणी डिजिटल शाळा सुरु केल्या आहेत. यात रंगरंगोटी करुन शाळा आकर्षकही करण्यात आल्या आहेत आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे.सर्वच शाळा डिजीटल करणारजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १८३७ शाळा आहेत. यापैकी सुमारे ५५० शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. इतर उर्वरीत सर्व शाळा देखील डिजीटल करण्याचा मानस जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूदही केली जात आहे.ग्राम पंचायत विभागला दिले पत्र१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्राम पंचायतींनी शाळांचे वीज बिल न चुकता भरावे, याबाबतच्या सूचना ग्रामपंचायतींना करुन ही बाब त्यांना बंधनकारक करण्यात यावी यासाठी शिक्षण विभागामार्फत सभापती पोपट भोळे यांनी नुकतेच ग्रामपंचायत विभागाला पत्र पाठविले असून सर्वसाधारण सभेने मान्य केलेल्या या विषयाची तातडीने अंमलबजावणी करावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.एकूण ७७ लाखाची थकबाकीजिल्ह्यातील शाळांकडे वीज बिलांची एकूण ७६ लाख ९१हजारावर थकबाकी आहे. यात सर्वाधिक धकबाकी जळगाव तालुक्याची १६ लाख ९२ हजार ९४४ इतकी आहे तर सर्वात कमी थकबाकी यावल तालुक्याची १लाख ९० हजार ९६१ इतकी आहे.विजच नाही, तर डिजीटल शाळांचा उपयोग काय?वीज बिल न भरल्यामुळे जवळपास सर्वच शाळांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मात्र वीजच नसेल तर शाळा डिजीटल करुन उपयोग काय? असा प्रश्न जि. प. सदस्य लालचंद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करुन ही स्थिती उद्भवू नये म्हणून राज्यातील अन्य एका जिल्हा परिषदेचे उदाहरण देत शाळांचे वीज बिल हे ग्राम पंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून भरावे, अशा सूचना कराव्या अशी मागणी केली होती मात्र याची दखलच न घेतल्याने पुन्हा हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडला होता.

टॅग्स :Schoolशाळा