शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील पावणे तीन लाख शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, आता निकषाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:56 IST

‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ची घोषणा

जळगाव : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ ची घोषणा राज्य सरकारकडून झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोन लाख ७२ हजार ८३२ शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकारने या पूर्वी सदर योजनेसाठी मागविलेल्या माहितीमध्ये जिल्ह्यातील वरील शेतकºयांकडे पीक कर्जाची १८२३ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती पाठविण्यात आली आहे. या शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी सरकारकडून यामध्ये आता तरी वेगवेगळे निकष लावून शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शेतकरी कर्जमाफीसाठी या पूर्वीच्या महायुती सरकारच्या काळात अगोदर राजकीय पक्षांचे आंदोलन व नंतर स्वत: शेतकºयांनीच सुरू केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन राज्य शासनाने दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही आधी २०१२ ते २०१६ पर्यंतचे थकबाकीदार शेतकºयांचा समावेश होता. नंतर त्यात सुधारणा करून २००९ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातून वेगवेगळ््या याद्या मागविण्यात आल्या. सोबतच यामध्ये अनेक जाचक अटी असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले.त्यानंतर राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली व शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा स्तरावरून माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाख ७२ हजार ८३२ शेतकºयांकडे पीक कर्जाची १८२३ कोटी ७१ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती पाठविण्यात आली.त्यानंतर २१ डिसेंबर रोजी राज्यातील शेतकºयांसाठी ‘महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यात सप्टेंबर २०१९ पर्यंत या योजनेंतर्गत प्रती शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. मार्च २०२०पासून योजनेचा लाभ थेट शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे.निकषाकडे लक्षशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. यात ‘किमान पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज’ तरी माफ होईल अशी शेतकºयांना आशा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन लाखाची मर्यादा टाकून हे सरकारदेखील अटी व निकष लावणार असल्याचे दिसत आहे, असा आरोप आतापासूनच शेतकरी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे निकष लावून शेतकºयांना वेठीस धरु नका, अशी मागणी केली जात आहे.मागच्या सरकारने छत्रपतींच्या नावाने फसवले तसे या सरकारने महात्मा फुले यांच्या नावाने शेतककºयांना फसवू नये, अशी अपेक्षा शेतकºयांनी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन लाखाची मर्यादा टाकून हे सरकारदेखील अटी व निकष लावणार आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे. असे न करता सरकारने शेतकºयांसाठी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा.- एस.बी. पाटील, शेतकरी कृती समिती

टॅग्स :Jalgaonजळगाव