शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुकी नदीचे पाणी पाटात सोडल्याने शेतकरी-अधिकाऱ्यांत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:37 IST

रावेर तालुक्यातील सुकी नदीचे पाणी पाटात सोडल्यामुळे सुकीच्या खोºयात येणाºया गावांमधील संतप्त शेतकºयांनी सोमवारी तहसील कार्यालयात आयोजीत केलेल्या बैठकीत कार्यालयात संताप व्यक्त पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. त्यामुळे यावेळ एकच खडाजंगी झाली.

ठळक मुद्देसंतप्त शेतकºयांना अधिकाºयांना द्यावे लागले लेखी आश्वासनरावेर तहसील कार्यालयात प्रश्नांच्या सरबत्तीमुळे उडाला गदारोळ

रावेर/ चिनावल जि. जळगाव : सुकी नदीचे पाणीपाटात सोडल्याच्या कारणावरून रावेर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या दालनामध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता आयोजीत केलेल्या बैठकीत संतप्त शेतकºयांचे दोन गट आणि अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शेतकºयांना अधिकाºयांकडून लेखी आश्वासन द्यावे लागले.गारबर्डी धरणाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तापी नदीत न सोडता पाटचारीत सोडल्याने सुकी नदी खोºयातील शेतकºयांची बैठक तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संतप्त शेतकºयांनी पाटबंधारे शाखा अभियंता नेमाडे, शाखा अधिकारी महेश पाटील यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रश्नावरून तालुक्यातील संबधीत गावांमधील शेतकºयांमध्ये दोन गट पडल्याचे यावेळी निदर्शनास आले.रोझोदा, कोचुर, चिनावल, सावखेडा कुंभारखेडा, गौरखेडा, उटखेडा विवरे, खिरोदा, मोठे वाघोदा, निंभोरा बुद्रूक, दसनुर या परिसरातील हजारो हेक्टरवरील केळी पिक सुकी नदीच्या पाण्यावर अवलंबून असून मागील वर्षी सुकी नदीला पाणी न आल्यामुळे या गावातील भूगर्भातील जलपातळी खुपच खालावली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. परिणामी सुकी पाणी वाटप सहकारी संस्थेने या भागातून १५ लाख रुपये गोळा करुन पाटबंधारे विभागाला दिल्याने उन्हाळ्यात सुकी नदीला गारबर्डी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या भागातील भूगर्भातील पाणी पातळी स्थिर होती. तशात धरण भरल्यामुळे शेतकºयांच्या जिवात जीव आला होता. सुकी नदीला पाणी आल्यामुळे हा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे हे पाणी पूर्णपणे तापी नदीला मिळू न देता सुकी नदीचे पाणी पाटचारीत सोडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यामुळे ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, कोचूर येथील कमलाकर पाटील, वाघोदा येथील पी. एल. महाजन, डी. के. महाजन, चिनावल येथील गोपाल नेमाडे, वाघाडी येथील पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, निंभोरा येथील दिगंबर चौधरी, कडू पाटील, सुनील कोंडे यांच्यासह शेकडो शेतकºयांनी जोपर्यंत शाखा अभियंता लेखी देत नाही तोपर्यंत तहसीलदार यांच्या दालनातून हलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर शाखा अभियंता महेश पाटील यांनी पाटबंधारे कार्य. अभियंता विश्वे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर शेतकºयांना लेखी आश्वासन देण्यात आले. 

टॅग्स :Waterपाणी