शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 21:47 IST

तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.

ठळक मुद्दे शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी तलाठी बांधवांच्या आंदोलनाचा फटकाउत्पन्न दाखल्यांसाठी ४०० ते १५०० रुपये

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२७ - तलाठीबांधवांच्याआंदोलनामुळेविद्यार्थ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक दाखलेही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी उत्पन्नांचे दाखले आवश्यक आहे.मात्र तो ही मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाआहे.

२ आॅक्टोबरपासून तलाठी संघटनांनी विविध २५ मागण्यांसाठी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे ग्रामीण भागात रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला नागरिकांना दिला जात नाही.  शासनाकडून याबाबत कोणतीही सकारात्मक चर्चा होत नसल्याने तलाठी संघटनांनी आपले बहिष्कार आंदोलन सुरुच ठेवले आहे. मात्र या आंदोलनाचा फटका महाविद्यालयीन विद्यार्र्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी ३१ आॅक्टोबर शेवटची मुदत आहे. मात्र उत्पन्नाचे दाखल मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता येत नसल्याचे चित्र आहे.

महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्षउत्पन्नांचे दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना अडचणी येवू नये म्हणून तहसील कार्यालयांकडून महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेताना उत्पन्नांचा दाखल्याऐवजी विद्यार्थ्यांकडून ‘स्वयंघोषणा’ पत्र घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत. तलाठ्यांचे आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यार्थी आपला उत्पन्नांचा दाखला जमा करतील असे या पत्रकात म्हटले आहे. मात्र महाविद्यालयांकडून तहसीलदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले असून, विद्यार्थ्यांकडून उत्पन्नांचा दाखला मागितला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अडचणी वाढल्या आहेत.

उत्पन्न दाखल्यांसाठी ४०० ते १५०० रुपये१.शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याने तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र तलाठी संघटनांकडून सुरु असलेल्या आंदोलनाचा फायदा वेंडर कडून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जात असल्याचीतक्रारविद्यार्थ्यांनी‘लोकमत’कडेकेली.२. एका दिवसात उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये घेतले जात आहेत. तर तीन ते चार दिवसात दाखला हवाअसल्यास ४०० ते ६०० रुपये वेंडर्सकडून घेतले जात आहेत.  

मुदत वाढविण्याची मागणी५ आॅगस्टपासून शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन असल्याने महिनाभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करता आले नाही.  सर्व्हरची समस्या मार्गी लागल्यानंतर आता तलाठ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.