शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या प्रदुषणामुळे जळगावात जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 12:11 IST

पाणी दूषित, वायूदूषित, अन् ध्वनी प्रदूषणाचाही पडलाय विळखा

जळगाव : शहरातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून, ध्वनी, वायु व जल प्रदुषणामुळे जळगावात राहणे देखील आता कठीण झाले आहे. जळगाव शहर राज्यातील इतर शहरांच्या दृष्टीने औद्योगिकीकरणापासून मागे असले तरी प्रदुषणात मात्र वाढ होत आहे.शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठ्याचा कामामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. यामुळे शहरातील हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सहन करावा लागत आहे.शहरात वाघूर धरणाकडून येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा जलवाहिनीत अनेक ठिकाणी गळती असल्याने जलप्रदुषण देखील होत असून, नागरिकांना अनेकदा अशुध्द जलपुरवठा होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. मेहरुण तलावात परिसरातील घरांचे सांडपाणी थेट सोडण्यात येत असल्याने मेहरुण तलावातही प्रदुषण होत असून, यामुळे तलावातील व परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पाला लागणाºया आगीतून निघणाºया धुरामधून मिथेन वायु बाहेर पडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचत आहे.प्रशासन काय उपाय करतेय?जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात तब्बल ६६ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांचा सहभाग तर आहेच, त्यासोबतच सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, नागरिकांनाही या वृक्ष लागवड मोहीमेत सहभागासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. त्यासाठी वनविभागाच्यावतीने जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.सवयींमध्ये बदल केल्यास पर्यावरणाचा समतोल शक्यलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ झाडांची संख्या मात्र कमी होत आहे़ यामुळे मोठ्या शहरांची आजची हवेची प्रदुषणाची पातळी बघितली तर ती धोकादायकच आहे, यासाठी आपण आपल्या छोट्या छोट्या सवयी बदल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागू शकतो, असे मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले आहे़ झाडे लावणयसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे आवाहनही या तज्ञांनी केले आहे़तज्ञांच्या मते काय आहेछोट्या छोट्या बाबींसाठी वाहनांचा वापर शक्यतोवर टाळावीजेची बचत करा, अनावश्यक वापर टाळा, दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहीत कराप्लास्टीक बंदीची मानसिकता स्वत:मध्ये विकसीत करावृक्षारोपणासह त्याच्या संवर्धनावर भर द्या

टॅग्स :Jalgaonजळगाव