शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा व भडगाव तालुक्यातील समस्या आमदारांच्या हतबलतेमुळे : माजी आमदार दिलीप वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:45 IST

अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला बोलावले नाही असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त करणारे आमदार किशोर पाटील हे हतबल आहेत. त्यामुळेच मतदार संघाचे प्रचंड नुकसान होत असल्याची खंत माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ठळक मुद्देमाजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला हल्लामुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निमंत्रण नव्हते तर ठिय्या का मांडला नाहीआमदार किशोर पाटील जिल्ह्यातील सत्ताकेंद्रातील भागिदार

पाचोरा - अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला बोलावले नाही असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर रोष व्यक्त करणारे आमदार किशोर पाटील हे हतबल आहेत. त्यामुळेच मतदार संघाचे प्रचंड नुकसान होत असल्याची खंत माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.मतदार संघाच्या बोंड आळी, दुष्काळ, बलून बंधारा, शेतकरी कर्जमाफी या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री अधिकाºयांच्या आढावा बैठकीला लोकप्रतिनिधींना निमंत्रित करो अथवा नको जनतेचे प्रतिनिधी या नात्याने आढावा बैठकीच्या दारावर आमदार पाटील यांनी ठिय्या का मांडला नाही ? असा सवाल त्यांनी केला.साध्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी ठिय्या आंदोलन करणारे आमदार मतदार संघाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी निमंत्रणाची वाट पाहतात. मतदारसंघाचे प्रश्न आणि अडचणींना वाºयावर सोडतात ही बाब पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेसाठी दु:खदायक असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी पक्षाच्या सरकारच्या काळातील बंधाºयांच्या सर्व तांत्रिक मान्यताच्या कामाचा उल्लेख करणारे आमदार मतदार संघात एकही मोठे काम करू शकले नाही. मतदार संघातील शेतकरी आणि सामान्य जनता त्रस्त असून आमदार हतबल असल्याचे चित्र आहे. ते जिल्हा बँकेत उपाध्यक्ष आहेत तर दूध संघात संचालक आहेत. या सत्तेतल्या भागीदारीच्या कारणाने आमदार किशोर पाटील यांचा आवाज कमी झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.यावेळी नगरपालिकेतील गटनेते संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष आणि नगरसेवक रणजित पाटील, शहराध्यक्ष सतीश चौधरी, शशिकांत चंदिले, अजहर खान आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PachoraपाचोराNCPराष्ट्रवादी काँग्रेस