शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात १०० कोटींच्या निधीमुळे रस्त्यांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:13 IST

अमृत योजनेची काम सुरु असतानाही रस्ते होणार

ठळक मुद्देवाढीव भागातही मिळणार मुलभूत सुविधाआमदार सुरेश भोळे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

जळगाव : शासनाच्या महाराष्टÑ सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातंर्गत शहरातील विकास कामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. या निधीमुळे शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यावर प्राधान्य राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांमुळे या योजनेची कामे संपल्यानंतरच रस्त्यांची कामे सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, आता रस्त्यांची कामे सुरु करावे की नाही याबाबतचे सर्व अधिकार आयुक्तांना दिले असल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नगरोत्थान निधीच्या नियमाप्रमाणे यात मनपाचा ३० टक्के हिस्सा राहणार आहे.वाढीव भागात मुलभूत सुविधामनपा आयुक्तांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जळगाव मनपाला शहर विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्याबाबतचे पत्रही मनपाला प्राप्त झाले. या निधीव्दारे शहरातील रस्त्यांच्या कामाला अधिक महत्व दिले जाणार आहे. रस्त्यांसह शहरातील वाढीव भागांमधील नागरिकांसाठी मुलभुत सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.शंभर कोटींचा असा असेल प्रवासशासनाने मनपाला विकासकामांसाठी शंभर कोटींच्या निधीला मान्यता दिली असली तरी त्याचा प्रवास मोठा असणार आहे. मनपाला ज्या कामांसाठी निधी लागणार आहे. त्या कामांसाठी शासनाच्या तांत्रिक प्राधिकरणाकडून अभिप्राय घ्यावा लागेल. त्यानंतर मनपा संचालकाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. नंतर शासनाकडून अंतीम मंजुरी प्राप्त होईल.आमदार सुरेश भोळे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभारजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मनपा निवडणुकीच्या वेळेस महिनाभरात १०० कोटी रुपयांचा निधी आणू असे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्यानुसार मनपाला १०० कोटीच्या निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार चंदूलाल पटेल व हरिभाऊ जावळे उपस्थित होते.शासनाची डुलकीशासनाने पाठविलेले पत्र आयुक्तांना सोमवारी प्राप्त झाले. मात्र, या पत्रात जळगाव महानगरपालिकासह जिल्हा सांगली असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा निधी नेमका जळगावला की सांगलीला हे कळत नव्हते. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जळगावसोबतच सांगलीमध्ये देखील भाजपाला बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्र्यांचे सांगलीवर देखील प्रेम असल्याने ही चुक झाली का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणारशंभर कोटी रुपयांच्या निधीमध्ये ज्या भागांमध्ये अमृत योजनेतंर्गत पाईप-लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागांमध्ये रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी अमृत योजनेचा आराखडा तपासून ज्या ठिकाणी खोदकाम होईल तेवढा भाग सोडून दिला जाणार आहे. मुख्य रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून यामध्ये टॉवर चौक ते महाबळ चौक पर्यंतचा रस्ता व टॉवर चौक ते अजिंठा चौकापर्यंतचा रस्ता तयार के ला जाणार आहे. तसेच संपूर्ण रिंगरोडचे देखील काम हाती घेण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यांलगत काही भागांवर फुटपाथ तयार केले जाणार असून मुख्य चौकांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविले जाणार आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव