शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी पिता कजर्बादारी होत असल्याने मुलाची आत्महत्या तर मुलाच्या उपचारास पैसे नसल्याने पित्याने केले विषप्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 00:45 IST

जळगावात हळहळ : पितृप्रेम व पूत्रप्रेमाचे ह्रदयद्रावक चित्र

ठळक मुद्देगळफास घेतला व आपली जीवनयात्रा संपविलीचार-पाच दिवसांपूर्वीच दीड लाखाचे कर्ज घेतलेमुलाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पिता अस्वस्थ

जळगाव, दि. 23 - ज्या मुलाच्या शिक्षणासाठी पित्याने कर्ज घेतले त्याच मुलाने वडील कजर्बाजारी होत असल्याच्या विचारातून गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसरीकडे पोटच्या गोळ्य़ाच्या उपचारासाठी वेळेवर पैसे मिळत नसल्याने पित्याने विषप्राशन केल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवारी जळगाव जिल्ह्यात घडली. 

पळसोदच्या तरुणाने घेतला गळफासजळगाव तालुक्यातील पळसोद येथील रहिवासी व एका खाजगी कंपनीत कामाला असलेले भगवान पाटील यांना डिगंबर व महेश ही मुले आहेत. यातील डिगंबरच्या शिक्षणासाठी भगवान पाटील यांनी चार-पाच दिवसांपूर्वीच दीड लाखाचे कर्ज घेतले. त्यात अगोदरच भोकर विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज असल्याने वडील अधिक कजर्बाजारी होत आहे व ते कसे कर्ज फेडतील याच तणावात  डिगंबर राहत होता. त्याला कुटुंबीयांनी समजवून व धीर देण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो त्याच मनस्थितीत होता. शनिवारी तो आजीसह शेतात काम करीत असताना त्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गळफास घेतला व आपली जीवनयात्रा संपविली. घरी असलेला महेश हा त्याचा भाऊ शेतात गेला असता त्याला डिगंबरने गळफास घेतल्याचे दिसून आले. हे दृष्य पाहून तो हादरून गेला. त्यानेच डिगंबरला खाली उतरविले व इतरांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी त्याचे वडील भगवान पाटील व भाऊ महेश यांना शोक अनावर झाला होता.  

मुलाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पिता अस्वस्थ दुस:या एका घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री येथील भरत चरणसिंग भिलाले (27) या पित्याने मुलाच्या उपचारास हक्काचे पैसे मिळत नसल्याने विषप्राशन केले. भरत भिलाले यांचा मुलगा आजारी असल्याने त्यास मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोलमजुरी करणारे भरत भिलाले हे ज्या ठिकाणी काम करतात तेथे आपल्या मजुरीचे पैसे मागूनही मिळत नसल्याने व आपण पोटच्या गोळ्य़ास वेळेवर पैसे लावू शकत नसल्याने पिता अस्वस्थ झाला व त्याने शनिवारी विषप्राशन केले. त्यानंतर भिलाले यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.