शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बारावी परीक्षेच्या निकालातील अपयशाच्या भीतीने विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 17:45 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या उद्या बुधवारी घोषित होऊ घातलेल्या निकालातील अपयशाच्या भीतीने तालुक्यातील अहिरवाडी येथील विद्यार्थ्यांनी पूजा भगवान चौधरी (वय १८) या विद्यार्थिनीने राहत्या घराच्या छताला तिच्या स्वतःच्या ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.

रावेर - उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेच्या उद्या बुधवारी घोषित होऊ घातलेल्या निकालातील अपयशाच्या भीतीने तालुक्यातील अहिरवाडी येथील विद्यार्थ्यांनी पूजा भगवान चौधरी (वय १८) या विद्यार्थिनीने राहत्या घराच्या छताला तिच्या स्वतःच्या ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अहिरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान लहानू चौधरी यांची एकुलती एक कन्या पूजा भगवान चौधरी ही केर्‍हाळे येथील कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने मार्च २०१८ ची इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान, सदर बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी जाहीर होऊ घातला असतानाच तिने परीक्षेतील अपयशाच्या भीतीपोटी राहत्या घराच्या छताला स्वतः च्या ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची दुर्दैवी घटना मृत पूजा हिच्या राहत्या घरी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. आईवडिलांची लाडक्या पूजाने परीक्षेच्या निकाल घोषित होण्यापूर्वीच अपयशाचा धसका घेऊन मृत्यूला कवटाळून घेतल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे.मृत पूजा हिचे काका सुनील गबा चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पाटील व डॉ. संदीप पाटील यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान अहिरवाडी येथे शोकाकुल वातावरणात मृत पूजा हिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ गोकूळ असा परिवार आहे. केर्‍हाळे येथील माजी सरपंच तथा शिवसेना विभागप्रमुख अनिल पाटील यांची ती भाची होत. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ श्रीराम वानखेडे हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षाeducationशैक्षणिक