शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या हवामानाचा परिणाम, पुढील दोन आठवडे उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:02 IST

केळीला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, आता उत्तर महाराष्टÑ व विदर्भावर तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यामुळे उत्तर-पश्चिमेकडून येणारे उष्ण वारे सक्रीय झाले आहेत. पुढील आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमान वाढायला सुरुवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पारा ४१ अंशापेक्षा जास्त राहिला. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.ढगाळ वातावरणाने दिलासामात्र १४ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तीन दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात ६ ते ७ अंशाची घट होवून ४३ अंशावर गेलेला पारा ३६ अंशावर आला होता. त्यामुळे काही दिवस का असेना नागरिकांना प्रचंड उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता जिल्ह्यात सर्वत्र कोरडे हवामान पहायला मिळत असून, वातावरणातील आर्द्रता देखील कमी झाली असल्याने तापमानात वाढ होणार आहे.दरम्यान, रविवार २१ रोजी जळगावचे तपामान ४० अंश सेल्सीअस इतके नोंदविले गेले. यात आणखी वाढ होणार आहे.उष्ण लाटेचे कारणमध्य महाराष्टÑ ते विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाची ट्रफ रेषा तयार झाली होती. त्यातच पश्चिम भागाकडून येणारे उष्ण वारे व बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे गारपीट देखील गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झाली. मात्र, आता हवेचा कमी दाबाची रेषा कर्नाटक व तेलंगणाकडे सरकली आहे.त्यातच उष्ण वारे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. कोरड्या हवामानासह जोरदार वारे वाहत असल्याने तापमानात ३ ते ४ अंशाची वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. २४ एप्रिल ते ५ मे दरम्यान उष्ण लाटेचे प्रमाण सर्वाधिक राहण्याची शक्यता असून, पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.केळीला फटका... गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट व वादळामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले होते. आता उष्ण लाटेमुळे केळीच्या मृगबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. अति उष्णतेमुळे केळीची वाढ खुंटण्याची भिती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. तसेच वादळी वाºयामुळे नुकसान झालेल्या चोपडा आणि जळगाव तालुक्यातील कठोरा, सावखेडा, किनोद भागातील केळीचे अद्यापही पंचनामे न झाल्यामुळे या भागातील शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव