शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

वाहने बंद पडल्याने कोंडी

By admin | Updated: May 20, 2014 01:19 IST

बांभोरी पूल व अजिंठा चौफुली : साडे चार तास खोळंबा

 जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलावर सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास तीन वाहने एकाच वेळी बंद पडल्याने तब्बल तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला. ही वाहतूक सुरळीत झाल्यानंतर एकाच वेळी वाहने निघाल्याने पुन्हा अजिंठा चौफुलीजवळ दीड तास रहदारी अडकून पडली. वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे काही वेळेनंतर वाहतूक सुरळीत झाली मात्र वाहनधारक व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलावरून सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एमएच ३४ वाय १५३४ हा खताने भरलेला ट्रक धुळ्याकडे जात होता. ट्रकच्या खालच्या बाजूचा रॉड अचानक तुटल्याने ट्रक बांभोरी पुलाच्या मधोमध अडकून पडला. या दरम्यान दुसर्‍या बाजूने जाणार्‍या वाहनधारकांची पुढे जाण्यासाठी घाई सुरू झाल्याने रहदारीचा खोळंबा झाला. या ठिकाणची रहदारी सुरळीत होत असताना बांभोरीकडून जळगावकडे येत असलेली एमएच १९ वाय २०२६ या प्रवासी वाहतूक करणार्‍या कालीपिलीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अचानक बंद पडली. पुलाच्या शेवटच्या टोकावर ही कालीपिली बंद पडल्याने चालकाने तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन सुरू होत नसल्याने अनेक वाहनांची अडचण झाली. त्यातच जळगावकडून धुळ्याकडे जात असलेली एमएच ०४ बीएस ८१४ ही कार अचानक बंद पडली. एकाच वेळी तीन वाहने बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा झाला. इकडे बांभोरी गावाच्या पुढे वाहनांची रांग लागून होती. तर दुसर्‍या बाजूला खोटे नगरपर्यंत रांग लागून होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे रामकृष्ण भोसले, राज्य महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक अशोक कळमकर, तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आधार निकुंभे हे कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एका-एका बाजूच्या वाहनांना पुढे काढत रहदारी सुरळीत केली. बंद कारला पोलीस तसेच वाहनधारकांनी मागून धक्का देत बाहेर काढले. क्रेनच्या मदतीने काढला ट्रक वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागवित हा ट्रक बाजूला काढला. या ट्रकमध्ये खत भरलेले असल्याचे उपनिरीक्षक कळमकर यांनी सांगितले.