कजगाव (ता. भडगाव) : येथील ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक एकनाथ शिवराम बोरसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून दर आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. चाळीस वर्षांपासून अनवाणी पायाने दिंडीत सहभाग घेत कधी रेल्वेने, तर कधी एस.टी. बसने प्रवास करून आपली यात्रा पूर्ण केली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पंढरपूरची वारी सर्वसामान्य भक्तांसाठी बंद असल्याने विठ्ठल भक्त नाराज झाले आहेत.
कोरोना संपल्यानंतर दर्शनासाठी जाणार असल्याचे ज्येष्ठ नागरिक एकनाथ बोरसे यांनी आपली भावना व्यक्त केली. कजगाव येथील विठ्ठलभक्त तब्बल चाळीस वर्षे पायी वारी, रेल्वे, एस.टी. बस व विविध माध्यमातून भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊन आले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर यात्रा बंद असल्याने विठ्ठलाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ यंदाही कायम आहे. कजगाव येथील रहिवासी एकनाथ शिवराम बोरसे हे १९८० सालापासून दर आषाढी एकादशीला भगवान विठ्ठलाच्या भेटीला जात असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूमुळे पंढरपूर यात्रा बंद असल्याने, त्यांना विठ्ठलाचे दर्शन होत नाही.
गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरची वारी बंद असल्याने ४० वर्षांच्या विठ्ठल भेटीला खंड पडला आहे. त्यामुळे भगवान विठ्ठलाचे दर्शन यंदाही गावातूनच घ्यावे लागणार आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून अनवाणी
ज्येष्ठ नागरिक एकनाथ बोरसे हे गेल्या चाळीस वर्षांपासून अनवाणी फिरतात. यात तब्बल अकरा वर्षे अनवाणी पायाने दिंडीत सहभागी झाले तर गावात शेतात सतत अनवाणी पायाने फिरण्याचे चाळीस वर्षे पूर्ण केले आहे. आज वयाच्या ८१ वर्षीदेखील अनवाणी पायाने फिरण्याचा उत्साह मात्र तोच आहे.
170721\17jal_7_17072021_12.jpg
एकनाथ बोरसे