शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पत्ता विचारण्याचा बहाणा करीत वृद्धेची सोनसाखळी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 22:04 IST

दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नलिनी भागवत चौधरी (वय ६९, रा.मोहन नगर, मोहाडी रोड) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचा तीन तोळ्याचा सोन्याचा गोफ व ३० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याचे मणी असलेली माळ असे ९० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता मोहाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमोहाडी रस्त्यावरील घटना ९० हजाराचे होते दागिनेदुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१४ : दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नलिनी भागवत चौधरी (वय ६९, रा.मोहन नगर, मोहाडी रोड) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचा तीन तोळ्याचा सोन्याचा गोफ व ३० हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याचे मणी असलेली माळ असे ९० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता मोहाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नलिनी चौधरी या मोहन नगरात एकट्याच राहतात. मुलगा प्रबोध नोकरीनिमित्त मुंबई येथे स्थायिक आहे तर मुलगी कल्पना भुसावळ येथे सासरी तर दुसरी मुलगा अर्चना पुणे येथे राहायला आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता घराशेजारील देशमुख यांच्यासोबत बोलत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन दोन जण आले. मागे बसलेला एक जण चौधरी यांच्याजवळ चिठ्ठी घेऊन आले, ती व्यक्ती कुठे राहते. अशी विचारणा करीत असताना देशमुख यांनी आम्हाला काय विचारतो, पुढे जा असे सांगून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता त्याने काही क्षणातच चौधरी यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ व गोफ लांबवून पळ काढला.

दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखलदुचाकीवर आलेले दोन्ही चोरटे ३० वयोगटातील आहेत. एकाने पिवळ्या रंगाचा तर दुसºयाने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. दुचाकीच्या नंबरप्लेटवर चिखल लागलेला होता. त्यामुळे दुचाकीला क्रमांक होता की नाही ही देखील शंका आहे. दरम्यान, चौधरी यांनी सायंकाळी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल अरुण निकुंभ तपास करीत आहेत.