शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

चोपडा येथील नागपुरे बंधूंची अक्षरयात्रा दुबईवारीवर, मराठमोळ्या कलाक्षरांचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 12:45 IST

अनोखी भरारी

ठळक मुद्देगुरुवारपासून दुबईत प्रदर्शनजन्मजात वारसा

कुंदन पाटील / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21 - अक्षरांना आबदार आणि रूबाबदार साज चढविणा:या चोपडय़ातील कलाशिक्षकाचा वारसा दुस:या पिढीनेही तेवत ठेवला आहे. नागपुरे भावंडांच्या कलाकृतीने भरविलेल्या अक्षरयात्रेला दुबईतील ह्यउद्योग इंडियात स्थान मिळाले आहे. मराठमोळ्या अक्षरांचे व:हाड उद्या दुबईवारीवर निघणार आहे.आनंदा बंडू नागपुरे यांचा हा वारसा. चोपडा येथील प्रताप विद्यालयात कलाशिक्षक म्हणून सेवेत असताना आनंदा नागपुरे यांनी अक्षरांचा साज चढविला.अक्षरेही आनंदाने ताल धरु लागली. सेवेत असतानाच नागपुरेंचे निधन झाले आणि अक्षरांची जत्रा अंधारमय झाली. वसंत आणि पंकज नागपुरे या दोन्ही सुपुत्रांच्या रक्तातही कला भिनली आणि अंधारमय बनलेली अक्षरजत्रा पुन्हा आनंदली. या दोन्ही भावंडांनी अक्षरांशी प्रेम कायम ठेवत वडिलांचा वसा आणि वारसा आनंदाने जपला.त्याचीच फलश्रुती म्हणून नागपुरे बंधूंच्या अक्षरांची कलाकृती आता दुबईत भरणा:या उद्योग इंडिया या प्रदर्शनात मांडली जाणार आहे. जन्मजात वारसाआनंदा नागपुरे हे मूळचे चोपड्यातील. कलाशिक्षक म्हणून सेवारत असताना त्यांना हृदयविकाराने हेरले आणि त्यांचे निधन झाले.अक्षरलेखन, पेंटिंग, साईन बोर्ड आणि बॅनर साकारण्यात ते माहीर होते.त्यांच्या निधनानंतर बारावीत शिकणा:या पंकज यांनी वडिलांच्या कलाकृतीला आधार द्यायला सुरुवात केली. वसंतरावही सोबतीला होतेच. मग नागपुरेंच्या घरात अक्षरयात्रा आनंदाने नांदायला लागली.अक्षरांच्या दालनात भावंड सक्रिय वसंत नागपुरे हे घोडगावच्या निकुंभ विद्यालयात कलाशिक्षक.त्यांची अक्षरयात्रा याआधी विविध प्रदर्शनात अनेकदा मांडली गेली. ह्यकॅलिग्राफीने अक्षरांना कलाकृतीचा सुवर्णस्पर्श देण्यात वसंतराव तसे तरबेजच.प्रेमात पाडणा:या चित्रकलेमुळे वसंतरावांची अनेक मान्यवरांकडून वाहवा झाली.अक्षरांच्या वळणांवरही त्यांचे कौतुक झाले. पुरस्कारही मिळाले. अनेक ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण शिबिरेही घेतली.पंकज नागपुरे हे लहान बंधू.वाद्यसंस्कृतीत रमणारा  कलावंत.फोटोग्राफी हा त्यांचा छंद. अक्षरांना जपणारे पंकज हे चोपड्यातील प्रताप विद्यालयात कलाशिक्षक.त्यांनीही अनेकदा त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविले.ह्यआनंद अक्षरच्या पितृछत्राखाली  ह्यकॅलिग्राफीला जीवंतपणा आणला.राष्ट्रीय पातळीवर त्यांना पुरस्कार देऊन गौरविले गेले. कलेने भिजलेले पंकज ह्यजाणता राजाच्या महानाट्यातही रंगमंचावर पोहचले.लिखाणात सुरेखता यावी म्हणून त्यांनी विद्याथ्र्यांसाठी कार्यशाळाही घेतल्या आणि घेताहेत.गुरुवारपासून दुबईत प्रदर्शनवसंत आणि पंकज नागपुरे यांच्या अक्षरांच्या कलाकृती, चित्र आणि ह्यकॅलिग्राफीचा अविष्कार दुबईत भरणा:या ह्यउद्योग इंडियाच्या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. मराठमोळ्या भावंडांना या प्रदर्शनात एक स्टॉल देण्यात आला आहे. या प्रदर्शनात भारत, दुबई आणि द.आफ्रिका या तीन देशातील कलावंतांना स्थान देण्यात आले आहे. दि.23 ते 25 नोव्हेंबर या तीन दिवसीय प्रदर्शनासाठी नागपुरे बंधू मंगळवारी रवाना होणार आहेत.