शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव परिसरात ‘कोरडा चारा’ कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:16 IST

यंदा पर्जन्यमानाने सरासरी न गाठल्याने डिसेंबरपासूनच जलसंकट गडद झाले असून, सद्य:स्थितीत जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाऱ्याचे भाव चांगलेच कडाडले आहे.

ठळक मुद्देअत्यल्प पर्जन्यमानामुळे बिकट परिस्थितीदुष्काळाचा वणवा पेटल्याने चारा-पाण्याची मोठी टंचाईचाळीसगाव परिसरात जनावरांची संख्या मोठीपशुपालकांची चाऱ्यासाठी परजिल्ह्यात भटकंतीहिरवा चारा करावा लागतो अ‍ॅडव्हान्स बुकींगचारा छावण्या सुरू करण्याची मागणी, पशुपालक व शेतकरी हतबल

चाळीसगाव, जि.जळगाव : यंदा पर्जन्यमानाने सरासरी न गाठल्याने डिसेंबरपासूनच जलसंकट गडद झाले असून, सद्य:स्थितीत जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाऱ्याचे भाव चांगलेच कडाडले आहे. थेट अक्कलकुवा, नंदुरबार परिसरातून चारा येथे येत असून, दोन हजार ८०० रुपये शेकडा अशी उसळी त्याने घेतली आहे. पुढील महिन्यात हे भाव तीन हजाराच्या पुढे जातील, असे विक्रेत्यांनी सांगितले.चाळीसगाव परिसरात दूध-दुभत्याचा व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक घरटी जनावरे दावणीला बांधलेली असतात. शेतीला जोडधंदा म्हणूनही शेतकरी पशुपालन करतात. त्यामुळे जनावरांची संख्याही मोठी आहे. यंदा मात्र चारा आणि पाणी समस्येने पशुपालकांना मेटाकुटीला आणले आहे. चाºयाच्या शोधात शेतकऱ्यांना परजिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.यावर्षी पावसाळ्यात आभाळमाया फारशी बरसली नाही. पावसाच्या हजेरीपेक्षा गैरहजेरीच अधिक होती. परतीच्या पावसानेही निराशा केल्याने रब्बी हंगामात शेतकºयांच्या झोळीत फारशे काही पडले नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य गहिरे झाल्याने चाºयाचीदेखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यात पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. चारा आणि पाण्याच्या समस्येचा दुधाच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याची कैफियत पशुपालक मांडतात. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात बहुतांशी विहिरी आटल्या आहेत. जनावरांना काय खाऊ घालायचे, असा प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहे. हिरवा चाºयाची तर अ‍ॅडव्हान्स बुकींग करावी लागत आहे.कोरड्या चाºयाची मागणी वाढलीचारा उपलब्ध नाही. त्यातच हिरवा चारा अल्प असल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाºयाची मागणी वाढली आहे. पशुपालक थेट परजिल्ह्यात चारा घेण्यासाठी जात आहे. शहरात हिरापूर रोड परिसरात अक्कलकुवा, नंदुरबार भागातून कोरडा चारा विक्रीसाठी आणला जात असून, त्याचे भाव यंदा वधारले आहे. २८०० रुपये प्रतिशेकडा अशा चढ्या दराने कोरडा चारा विक्री होत असून, पुढील महिन्यात हे भाव तीन हजाराहून अधिक असणार आहेत.शासनाने पशुपालक व जनावरे पाळणाºया शेतकºयांचा अंत पाहू नये. तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. तत्काळ जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात. पशुपालकांना चारा उपलब्ध करुन द्यावा. ग्रामीण भागात पाणीबाणी आहे. दावणीला बांधलेल्या जित्राबाला काय खाऊ घालायचे? या प्रश्नाने पशुपालक खचले आहेत.- भूषण काशिनाथ पाटीलसदस्य, जि.प. व जिल्हा नियोजन मंडळ 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChalisgaonचाळीसगाव