शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चार पलटी व शंभर फूट खोल ट्रक कोसळूनही चालक सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 19:41 IST

महामार्गावर बांभोरी पूलानजीकची घटना

जळगाव : समोरील वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने ट्रकने तीन पलट्या घेतल्या, त्यात शंभर फूट खोल जावून ट्रक थांबला. इतकी भयंकर घटना घडल्यानंतरही केवळ दैव बलवत्तर म्हणून की काय चालकाला जराही खरचटले नाही.  राजू माळी (रा.पाळधी, ता.धरणगाव) असे सुखरुप बचावलेल्या चालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी साडे आठ वाजता  राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी जकातनाक्याजवळ हा अपघात झाला.या घटनेबाबत घटनास्थळावरील लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी येथील सोपाळ कोळी यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्र.एम.एच. ०४ सी.यु २२८८ ) राजू माळी हा तरुण चालक आहे. रविवारी सकाळी ८.३०  वाजता ट्रक जळगावहून पाळधीकडे जात होता. यादरम्यान बांभोरी जकातनाक्यापासून काही अंतरावर समोरुन येणार्‍या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात तसेच ब्रेक न लागल्याने चालक राजू माळी याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यात ट्रक थेट शंभर फूट खोल असलेल्या दरीत कोसळला. यावेळी पाच ते सहा झाडे तुटली. या घटनेत  माळी याला अगदी किरकोळ दुखापत झाली असून ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहेत. पाच तासानंतर बाहेर काढला ट्रकतीन ते चार वेळा पलटी घेतल्यानंतर हा ट्रक एका ठिकाणी झाडात अडकला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह बांभोरी येथील तरुण तसेच नागरिकांनी धाव घेतली. वाहनधारक तसेच बांभोरी येथील तरुण यांच्या मदतीने अडकलेला ट्रक खाली नेण्यात आला. तत्पूर्वी ट्रकमधील चालक राजू माळी यास ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तसेच बांभोरी तरुण, वाहनधारक यांच्या अथक परिश्रमाने तब्बल पाच तासानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ट्रक  बाहेर काढण्यात यश आले.  

टॅग्स :Jalgaonजळगाव