शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी पकडलेले वाळू ट्रॅक्टर घेऊन चालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:09 IST

ग्रामस्थ व ट्रॅक्टर चालकामध्ये वाद

जळगाव / दापोरा : जळगाव तालुक्यात अवैध वाळूचा उपसा सुरूच असून विदगाव पाठोपाठ दापोरा येथेही वाळू उपशास विरोध करण्यावरून वाद झाला. दापोरा येथे ३ रोजी वाळू उपसा करणाऱ्यांना रोखण्यासाठी ग्रामस्थ थेट गिरणा नदी पात्रात उतरले. त्यावेळी वाळू उपशास विरोध करीत वाळूने भरलेले विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत असताना वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. दरम्यान, विदगाव येथून सहा वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेताना यावल तालुक्यातील कोळन्हावी ता. यावल येथील सरपंचांनी जमाव जमवून दगड फेक करण्याची धमकी देण्यासह ट्रॅक्टर पळवून नेणाºया मालक व चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याविषयीचे जळगावच्या तहसीलदारांनी यावल तहसीलदारांना पत्र दिले आहे.दापोरा येथे गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सर्रासपणे केला जातो. यात वाळू वाहतूकदार गावकऱ्यांनादेखील जुमानत नाही. या बाबत त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरी त्यास अवैध वाळूचा उपसा करणारे जुमानत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे ३ रोजी गिरणा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू असताना ग्रामस्थांनी थेट गिरणा पात्र गाठत वाळू वाहतूक करण्यास मज्जाव केला. त्या वेळी तेथे वाळूने भरलेले रवंजा ता.एरंडोल येथील विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर पकडून नदीपात्रातून गावाकडे आणत होते. मात्र मध्येच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.वाहनधारकांकडून स्थानिक पदाधिकाºयांकडे बोटग्रामस्थानी वाहने अडवून ट्रॅक्टर महसूल यंत्रणेच्या ताब्यात देण्याविषयी सांगितले असता ट्रॅक्टर चालकाने नाव न घेता स्थानिक दापोरा व दापोरी येथील पदाधिकाºयांना विचारून वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगितले. त्या वेळी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.महसूल प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षादापोरा येथील अवैध वाळू उपशाविषयी महसूल प्रशासनास कळवूनदेखील कोणतीही कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाने अवैध वाळूचा उपसा करणाºया वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.कर्मचाºयांना ढकलून देत ट्रॅक्टर घेऊन पसारविदगाव येथे तापी नदी पात्रातून वाळू भरणाºया ९ ट्रॅक्टरवर कारवाई करीत ते घेऊन महसूलचे कर्मचारी येत असताना त्यातील सहा ट्रॅक्टरच्या मालक व चालकांनी पथकातील कर्मचाºयांना दमदाटी करून त्यांना ढकलून दिले व ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. या विषयी महसूल पथकाने चौकशी केली असता त्यात विकास जगन्नाथ साळुंखे (ट्रक्टर मालक), गोपाल प्रल्हाद साळुंखे, जगदीश संजय साळुंखे (चालक), मच्छिंद्र कौतिक साळुंखे (मालक), चैतन्य मच्छिंद्र साळुंखे (चालक), ज्ञानेश्वर कडू साळुंखे (चालक, मालक), गोलू ज्ञानेश्वर साळुंखे (चालक, मालक), बापू नारायण साळुंखे (चालक, मालक), पद्माकर सोपान साळुंखे, नामदेव मुकुंदा साळुंखे (चालक, मालक), सर्व रा. कोळ न्हावी, ता. यावल यांचा समावेश असल्याचे समजले.सरपंचाने दिली दगडफेकीची धमकीविदगाव येथे तापी नदी पात्रात कोळन्हावी येथील सरपंच गोटू साळुंखे हे मोठा जमाव घेऊन आले होते व ट्रॅक्टर नेले तर दगड फेक करू, अशी धमकी देत होते, असे जळगावच्या तहसीलदारांनी यावलच्या तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच शासकीय कामात अडथळा आणण्यासह पथकातील कर्मचाºयांना दमदाटी करीत वाहनावरून ढकलून देणे, दमदाटी केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याविषयी पत्र दिले आहे.दापोरा वाळू उपशाविषयी ‘महसूल’ अनभिज्ञदापोरा येथे गिरणा नदीपात्रातून वाळू उपशाविषयी तसेच ग्रामस्थ व ट्रॅक्टर चालकामध्ये झालेल्या वादाविषयी महसूल पथकास माहिती नसल्याचे सांगण्यात आले.ट्रॅक्टर केले जप्तविदगाव येथून पळवून नेलेले ट्रॅक्टर पकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिली.दापोरा येथे वाळू उपशावरून वाद झाल्याविषयीची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. विदगाव येथून नदीपात्रातून पळवून नेलेले ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहे.- वैशाली हिंगे, तहसीलदार, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव