शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

सौर ऊज्रेवर होतोय पाणीपुरवठा

By admin | Updated: January 12, 2016 00:34 IST

मुक्ताईनगर : महिला राज असलेल्या तालुक्यातील चिंचखेडे बु.।। ग्रामस्थांना पाणी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

मुक्ताईनगर : महिला राज असलेल्या तालुक्यातील चिंचखेडे बु.।। येथील पूरग्रस्त वस्तीमध्ये पाणीपुरवठा योजना थेट सौर ऊज्रेवर कार्यान्वित करून ग्रामस्थांना पाणी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

सरपंच, उपसरपंच आणि सदस्यही महिला असलेल्या या ग्रा.पं.ने तंत्रज्ञानाची कास धरत मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.

मुक्ताईनगर-कु:हा रोडवरील चिंचखेडे बुद्रूक हे दोन हजार वस्तीचे गाव. मुख्य रस्त्याला लागून पुनर्वसित चिंचखेडे बु.।।, तर रस्त्याच्या पलीकडे जंगलाच्या गावरानाच्या कुशीत पूरग्रस्त चिंचखेडे. या पूरग्रस्त वस्तीत साधारण 50 च्या आसपास कुटुंबांचा रहिवास. येथे पिण्याच्या पाण्यासाठी परिस्थिती तशी बेताचीच होती. या प्रतिकूल परिस्थितीत गावाचा गाळा हाकण्याची धुरा महिलांच्या हाती आली. तीन वॉर्ड, सात ग्रा.पं. सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये तीन जागा अनुसूचित जमातीच्या रिक्त आहेत. तर उर्वरित चारही जागांवर महिला सदस्या निवडून आल्या आहेत.

सरपंचपदाची धुरा भाग्यश्री पंडित पिळोदेकर तर उपसरपंच सुरेखा नितीन पाटील. सदस्या म्हणून पूनम वाघ, रेणुका निकम. या चार महिला ग्रा.पं.चा कारभार चालवत आहेत.

भाजपाच्या ताब्यातील या ग्रामपंचायतीच्या पूरगस्त वस्तीतील पाणीपुरवठा समस्या सोडविण्यास सरपंच भाग्यश्री पिळोदेकर यांनी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सौर ऊज्रेवर आधारित दुहेरी पंप लघु पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा योजना राबविली.

सौर ऊज्रेवर चालणारे पंप. टय़ूबवेल बसवून स्वतंत्र पाण्याची टाकी वितरण व्यवस्थेत सार्वजनिक नळ आणि खाजगी नळ कनेक्शन अशा स्वरूपात ही योजना आकारास आली आहे. इलेक्ट्रिक खर्चाची दगदगही नाही आणि संपूर्णत: सूर्यप्रकाशावर थेट पाणी योजना असल्याने भारनियमनाचा मनस्तापही नाही. मुख्य जलकुंभ भरला की, पंप बंद करणे आणि खाली होताच भरून घेणे अशा स्वरूपात पाणी वितरण येथे होणार आहे.

अशा या नावीन्यपूर्ण उपक्रमातून पूरग्रस्त चिंचखेडे बु.।। चा पाणीप्रश्न सुटला आहे. महिला राज असलेल्या ग्रा.पं.ने तंत्रज्ञानाची कास धरून सोडविलेला पाणीप्रश्न नक्कीच कौतुकास्पद आहे. यातून इतरांनी आदर्श घ्यावा अशी ही योजना आहे. (वार्ताहर)