शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

शेंदुर्णी येथे दारूच्या नशेत माथेफिरूने पेटवली पोलीस चौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 16:38 IST

शेंदुर्णी पोलीस चौकीत कोणी पोलीस कर्मचारी नसल्याचे पाहून समाधान बळीराम पाटील रा.शेंदुर्णी या माथेफिरूने दारूच्या नशेत पोलीस चौकीच पेटवून दिल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देजामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील प्रकारअवैध धंद्यांना परवानगी मिळत नसल्याने संताप

शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : शेंदुर्णी पोलीस चौकीत कोणी पोलीस कर्मचारी नसल्याचे पाहून समाधान बळीराम पाटील रा.शेंदुर्णी या माथेफिरूने दारूच्या नशेत पोलीस चौकीच पेटवून दिल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या माथेफिरूस ताब्यात घेऊन पहूर पोलीस स्टेशनला हलविले.यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, शेंदुर्णी येथे राहणारा समाधान बळीराम पाटील रा.शेंदुर्णी हा दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान पोलीस चौकीत आला. यावेळी तो दारू प्यालेला होता. पोलीस चौकीत यावेळी एकही कर्मचारी नव्हता. चौकीत कोणी नाही, असे पाहून या माथेफिरूने बरोबर आणलेल्या कॅनमधील रॉकेल पोलीस चौकीत सर्वत्र शिंपडले व चौकी पेटवून दिली.माथेफिरूची आरडाओरडपोलीस चौकी आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. त्यावेळी जवळपास राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. यावेळी हा माथेफिरू बाहेर उभा राहून जोरजोराने ओरडत होता. दोन तीन वेळेस येऊनही पोलीस अवैध धंद्यास परवानगी देत नाहीत, चौकीत कोणीही नसते, असे तो ओरडून सांगत होता, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.नागरिकांची धावपळपोलीस चौकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना जवळच्या नागरिकांनी व युवक मंडळींनी धाव घेतली. तोपर्यंत येथे कोणीही पोलीस नव्हते. या युवकांनीच एक ट्रॅक्टर बोलावून पाईपाद्वारे आग विझविण्यास सुरूवात केली. जवळपास अर्धा ते पाऊणतास ही आग सुरू होती. त्यानंतर पोलीस धावून आले. माथेफिरूला नागरिकांनी पकडून ठेवले होते. त्यालाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.वरिष्ठांनी दिली भेटघटनेची माहिती मिळताच पाचोरा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी शेंदुर्णी येथे धाव घेतली. त्यांनी व पहूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गावात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी माथेफिरू समाधान पाटील यास तत्काळ पहूर येथे हलविले.महत्वाची कागदपत्रे नष्टया आगीमुळे शेंदुर्णी पोलीस स्टेशनमधील सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. कपाटातील काही कागदपत्रे चौकीतून काढण्याचे काम सायंकाळपर्यंत पोलीस करत होते.पोलीस गायब३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेल्या शेंदुर्णी गावासाठी १२ पोलीस व दोन अधिकारी अशी पदे अपेक्षित आहेत. पोलीस चौकीत पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक असे पदे मंजूर आहे. मात्र अद्याप कुणाचीही नियुक्ती होऊ शकलेली नाही. केवळ ४ ते ५ पोलिसांवर या चौकीचे कामकाज चालते. हे.काँ. उदय कुलकर्णी यांच्याकडे या पोलीस चौकीचा पदभार असून ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते, असे सांगण्यात आले. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर